महाराष्ट्र14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये नवीन आकृतीबंधामध्ये सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे महापालिका कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने हे पद भरणे क्रमप्राप्त असल्याने ते रिक्त ठेवणे योग्य नाही. यासाठी महापालिकेच्या पदोन्नती समितीची ५ मार्च २०२१ रोजी बैठक झाली.
या बैठकीमध्ये शैक्षणिक अहर्ता, अनुभव कालावधी, आरक्षण, सेवाज्येष्ठता, गोपनीय अहवाल, संगणक अहर्ता आणि शिस्तभंग विषयक कारवाई इत्यादी सेवाविषयक तपशील पडताळून पाहता समितीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांना सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारीपदी बढती देण्यास समितीने मान्यता दिली. याबाबतचे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी काढले आहेत.
कोरोनाच्या काळात अहोरात्र रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्यात डॉ. लक्ष्मण गोफणे यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यांनी या काळात भोसरी येथील नवीन रुग्णालयाचा कार्यभार यशस्वीरीत्या संभाळला त्यावेळी त्यांना कोरोनाच्या संसर्गाला सुद्धा सामोरे जावे लागले, कोरोनाच्या या लढ्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…