Google Ad
Uncategorized

स्व. लक्ष्मणभाऊंचे काळेवाडीच्या विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करणार … महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांचा काळेवाडीकरांना शब्द

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २६ ऑक्टोबर – “लोकनेते स्व. लक्ष्मण जगताप यांचे काळेवाडीकरांवर विशेष प्रेम होते. काळेवाडीतील नागरिकांनीही नेहमीच आम्हाला खंबीरपणे साथ दिली. काळेवाडी प्रभागाचाही इतर गावांप्रमाणे आमूलाग्र विकास करण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र त्यांच्या अकाली जाण्याने त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले. त्यामुळे त्यांनी पाहिलेले काळेवाडीच्या सर्वांगीण विकासाचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यावेळी मला तुमचा आशिर्वाद हवा आहे, असे आवाहन शंकर जगताप यांनी नागरिकांना केले.

चिंचवड विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेना – राष्ट्रवादी – आरपीआय मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांचा काळेवाडी येथे झंझावाती प्रचार दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात ठिकठिकाणी नागरिकांनी गुलाब पुष्पवृष्टी करून तर महिलांनी औक्षण करून मोठ्या उत्साहात स्वागत केले. यावेळी काळेवाडी प्रभागातील सर्वपक्षीय मान्यवरांसह विविध कॉलनी, सोसायट्या आणि तापकीर नगर वसाहतीतील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी “तुमच्या रूपाने आम्हाला पुन्हा एकदा स्व. लक्ष्मणभाऊंचा सहवास लाभल्याचा आभास होत असल्याची”, भावना काळेवाडीकरांनी व्यक्त केली.

Google Ad

काळेवाडीचे ग्रामदैवत श्री. ज्योतिबाला नारळ वाढवून प्रचार दौऱ्याचा शुभारंभ झाला. या गाठीभेटीत नवनगर विकास प्राधिकरणचे प्रथम अध्यक्ष  बाबासाहेब तापकीर, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, माजी नगरसेवक सुरेश नढे पाटील, माजी स्वीकृत सदस्य  नवनाथ नढे, मल्हारी तापकीर, चंद्रकांत तापकीर, माजी नगरसेवक मुरलीधर ढगे, उद्योजक प्रकाश माळेकर, निलेश भोरे, प्रकाश लोहार, दत्ता होले, आतिष कांबळे, श्याम नढे, राजाभाऊ शिंदे, अंबादास भोरे, अनिकेत शिंदे, आबा पाटील, प्रशांत डगवार, रामदास करवे, संजय पाटील, विनायक पिंगळे, अशोक चव्हाण, रावसाहेब देशमुख, संजय दराड, गिरीश देशपांडे, आण्णा गुरव,  भिकाजी सावंत, सुदाम खोमणे, दीपक अंकुश,राजू वैराट, बाळासाहेब नढे, दीपक नढे, किरण नढे, शंकर नढे, विलास पाडाळे आदी मान्यवरांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी माजी नगरसेवक प्रमोद ताम्हणकर, माजी नगरसेविका ललिता पाटील, माजी स्वीकृत सदस्य  विनोद तापकीर, भाजयुमोचे शहराध्यक्ष तुषार हिंगे, माजी नगरसेवक शैलेश मोरे, बबलू सोनकर, माजी स्वीकृत सदस्य गोपाळ माळेकर, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य काळूराम नढे, हरेश तापकीर,  शिवसेना शिंदे गटाचे सुनील तात्या पालकर, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ तापकीर, रमेश काळे, गोरक्षक समितीचे मंगेश नढे, विलास पाडाळे, विजय सुतार, भाजपा उत्तर भारतीय आघाडीचे आकाश भारती, हर्षद नढे, भरत ठाकूर, उद्योजक बाबासाहेब जगताप, प्रमोद येवले, अमोल भोसले, गणेश कुडुंबळे, कैलास सानप, बजरंग नढे, अविनाश नढे, युवराज नढे, रुद्रराज नढे, प्रमोद मोरे, महेश शिंदे, विशाल सपकाळ, चेतन लष्करे, प्रवीण मोहिते, सुरेश सोनवणे, खंडू आव्हाड   यांच्यासह महायुतीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.adad

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!