Google Ad
Uncategorized

चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणूक मतमोजणीसाठी मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ संपन्न

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. २७: चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी मनुष्यबळाची संगणकीय माध्यमातून द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस. सत्यनारायण आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली.

चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदार संघात मतमोजणीसाठी प्रत्येकी १४ टेबल अधिक टपाली मतपत्रिकांसाठी १ टेबल असे एकूण १५ टेबल असणार असून, प्रत्येक मतदारसंघासाठी १८ पर्यवेक्षक, १८ सहायक आणि १८ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. आज दुसऱ्या रँडमायझेशनच्यावेळी संगणकीय प्रणालीने मतमोजणी मनुष्यबळाची सरमिसळ करण्यात आली.

Google Ad

यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी आरती भोसले, उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रमोद बोरोले, तहसीलदार निलप्रसाद चव्हाण, निवडणूक तहसीलदार रुपाली रेडेकर, सहायक जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी अश्विनी करमरकर उपस्थित होते.
०००

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!