महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१८ जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा ३४० वा पालखी प्रस्थान सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये संपन्न झाला.तुकोबांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले आहे. पावसाच्या आगमनात पालखीचे प्रस्थान ठेवले.पालखीचा आजचा मुक्काम इनामदार वाड्यात असेल. पुन्हा उद्या ही पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होईल.
ज्ञानोबा- माऊली तुकारामाच्या गजरात वारकरी पंढरपूरच्या दिशेने एक-एक पाऊल टाकतील.त्यानंतर जगतगुरु तुकोबांची पालखी उद्योगनगरी पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असेल.
टाळ-मृदुंगाच्या गजरात हजारो भाविक देहूत दाखल झाले असून मोठ्या उत्साहात आणि भक्ती भावामध्ये तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे. सोमवारपासूनच देहू नगरीत शेकडोच्या संख्येने वारकरी दाखल झाले होते.
पहाटेपासून विधिवत पूजा, आरती नंतर या सोहळ्याची सुरुवात झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होते. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, सुनेत्रा पवार, आमदार शंकर जगताप,आमदार अमित गोरखे, आमदार सुनील शेळके, आमदार उमा खापरे, विजय जगताप यांची देखील उपस्थिती होती.
ज्ञानोबा- तुकोबाच्या गजरामध्ये देहभान हरपून टाळ- मृदंगाच्या तालावर स्वतःला झोकून देतात. फुगडी, भगवी पताका घेऊन एक-एक दिंडी मंदिरातून पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार शंकर जगताप यांना फुगडीचा मोह आवरता आला नाही, आणि त्यांनी ही याचा आनंद घेतला.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.09 ऑगस्ट : हिंजवडीतील राजीव गांधी इन्फोटेक पार्कमधील स्थानिक ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या हद्दीत…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 08 ऑगस्ट :- रक्षाबंधनाचा सण म्हणजे बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक. यंदाचा रक्षाबंधन…
महाराष्ट्र 14 न्यूज, ७ ऑगस्ट - महापालिका प्रशासनाने देखील नागरिकांच्या समस्या समजून घेत त्या प्रभावीपणे…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.07ऑगस्ट :- एम .जी देवकर एज्युकेशनल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट स्टार प्री स्कूल…
महाराष्ट्र 14 न्यूज पिंपरी, ७ ऑगस्ट, २०२५ :* पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात एक…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 07 ऑगस्ट -- राज्यात आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वहायला…