Categories: Editor Choice

सांगवीत ‘कारगिल विजय दिन’ साजरा : स्वप्नांना सत्यात उतरवण्याआधी त्यांना व्यवस्थित पहावे लागते……..कॅप्टन हरी ओम कुमार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ जुलै) :- विद्यार्थ्यांनी नेहमी लक्षात ठेवायचे की अपयश ही यशाची पहिली पायरी असते, त्यामुळे स्वतःला यशस्वी होण्यासाठी नेहमीच प्रयत्नवादी असणे गरजेचे असते. आम्ही ज्यावेळी युद्धभूमीवर असतो त्यावेळी यश मिळते की नाही हे माहीत नसते, पण जिंकणार आम्हीच हीच भावना घेऊन आम्ही युद्ध करतो. म्हणुनच आपण कारगिल मध्ये विजय मिळवू शकलो. आपण स्वप्नांना सत्रात उतरवण्याआधी त्यांना व्यवस्थित पहावे लागते, तरच ती पूर्ण होतात असे मत 24.मराठा लाईफ इन्फंट्री औंध कॅम्प चे कॅप्टन हरिओम कुमार यांनी छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या कै.सौ. शकुंतलाबाई आनंदराव शितोळे प्राथमिक विद्यामंदिर, नूतन माध्यमिक विद्यालय, शिशुविहर सांगवी आयोजित ‘कारगिल विजय दिन’ कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.

मी ही एका सामान्य कुटुंबातला असून लहानपणापासूनच माझं स्वप्न होतं, फौज मध्ये भरती व्हायचं आणि देश सेवा करायची, ते स्वप्न आता पूर्ण होत आहे. घाबरू नका, सत्याला सामोरे जा आणि प्रयत्न करा! यश नक्कीच मिळेल असे ते म्हणाले. तुमच्या शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव माने एक प्रतिभावंत व्यक्ती आहे आणि शिक्षक आदर्श गुरुजन वर्ग आहे, त्यामुळे तुमचे भविष्य हे उज्वल असणार आहे यात शंका नाही असे ते म्हणाले.

यावेळी 24 मराठा लाईफ इन्फंट्री औंध कॅम्प चे सुभेदार संतोष गवस, हवालदार दीपक खोत यांनी कारगिल युद्धाची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली. याप्रसंगी बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी ज्या दोन हजार राख्या बनवल्या होत्या त्या राख्या सीमेवरील जवानांसाठी या 24 मराठा लाईन इन्फंट्री च्या अधिकाऱ्यांच्या हस्ते पाठवण्यात आल्या. अतिशय देशभक्तीपर वातावरण शाळेमध्ये होते सर्वांनी शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित केली.

या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव तुळशीराम नवले व बार्टी चे कर्मचारी संगीता शहादे व श्री कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक सुनिता टेकवडे, भाऊसो दातीर,सीमा पाटील, हेमलता नवले ,मनीषा लाड, स्वप्नील कदम, शितल शितोळे, दिपाली झणझणे, श्रद्धा जाधव, भाग्यश्री रापटे, संध्या पुरोहित ,गायत्री साखरे संगीता सूर्यवंशी ,नीता ढमाले, निर्मला भोईटे, कुसुम ढमाले, मनीषा गायकवाड यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक, शिवाजीराव माने यांनी केले व निवेदन आभार शिक्षक दत्तात्रय जगताप यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने केली.

Maharashtra14 News

Recent Posts

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

1 day ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

2 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

2 days ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

3 days ago