Categories: Editor Choice

सांगवीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाढती महागाई व दरवाढी निषेधार्थ तिरडी आंदोलन!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ मे) : पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाढती महागाई व वाढलेल्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीविरोधात ठिकठिकाणी निषेध आंदोलन करण्यात आले, जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौकात प्रतिकात्मक तिरडीवर गॅस सिलेंडर आडवा ठेवून तिरडी आंदोलन करीत निषेध करण्यात आला .

यावेळी जेष्ठ नागरिक, महिला भगिनी आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते . यावेळी उपस्थित महिलांनी महागाईविरोधात संतप्त भावना व्यक्त करीत केंद्र सरकारचा निषेध केला . ” महागाई वाढत जाय , गरिबांने खायचे काय ” , ” चिंतेत ताई माई , कधी संपणार महागाईं ” , ” कुठं गेला जाहिरनामा , झाला आमचा खिसा रिकामा , हिंदू मुस्लिम भाई भाई , जिवावर उठली महागाई , अशा घोषणा देत उपस्थितांनी निषेध नोंदवला , बांबू , पांढरे कापडाच्या प्रतिकात्मक तिरडीवर गॅस सिलेंडर आडवा ठेवून गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला .

यावेळी बबन शितोळे, सुनील ढोरे ,बाबासाहेब ढमाले, उज्वला ढोरे , पंकज कांबळे , मंगेश काळे , कोमल कवडे , मनीषा पुरी , संजय गंभीरराव , ओंकार ढोरे , सुनील गावडे , विशाल नायडू , विशाल ढोरे , विशाल जाधव , विलास कांबळे आदी उपस्थित होते . या निषेध मोर्चास सांगवी पोलिस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता . बाळासाहेब पिल्लेवार यांनी सूत्रसंचालन केले . तर आभार जावेद शेख यांनी मानले .

प्रशांत शितोळे म्हणाले , “ सर्वसामान्य जनता महागाईने त्रस्त झाली आहे . स्वयंपाकाचा गॅस एक हजार पार झाला आहे . पेट्रोल , डिझेलच्या किमतीने नागरिकांचे बजेट कोलमडले आहे . सर्वसामान्य जनता महागाईने मेटाकुटीला आली आहे . काँग्रेसच्या काळात तीनशे रुपयांचा गॅस तीस रूपयाने दरवाढ झाल्यावर आक्रोश करून सत्तेत बसलेले भाजपाई आत्ता कुठे आहेत . आधीच कोरोनाचे संकट झेलत त्यातून सावरत असतानाच महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल केले आहे . केंद्राने महागाईचे भूत नागरिकांच्या मानगुटीवर लादल्याने भ्रष्ट व नियोजनशून्य सरकारला घरी बसवले पाहिजे .

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

4 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

5 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

15 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

15 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago