Google Ad
Uncategorized

सांगवी परिसरात मृत्युंजय शाळेच्या विद्यार्थ्यांचा पावसाच्या रिमझिम सरी झेलत हरिनामातून पर्यावरण जल्लोष

महाराष्ट्र 14 न्यूज,( दि२८जून) : – मृत्युंजय एज्युकेशन सोसायटी प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभाग सांगवी येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत जनाबाई आणि वारकऱ्यांच्या पारंपरिक वेशात भक्तिमय पर्यावरण दिंडीत सहभाग घेतला.प्राणी पक्षी व विविध वृक्ष यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दिंडी ची शोभा वाढवली. मृत्युंजय शाळेच्या प्रांगणात विठ्ठल मंदिरासमोर शाळेच्या मुख्याध्यापिका मा. सौ. प्रमिला जाधव मॅडम यांनी पालखी पूजन करून पालखी सोहळयास प्रारंभ केला. विद्यार्थ्यांनी ढोल लेझीम चे विविध प्रात्यक्षिक दिंडीच्या माध्यमातून सादर केले.

झांज पथकाचा नाद सर्वांना ठेका धरायला लावत होता. काही विद्यार्थी ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करत हातात टाळ,ध्वज पताका घेऊन दिंडीत सहभागी झाले. अभंग गवळणी गात फुगड्यांचा आनंद विद्यार्थी व शिक्षक यांनी घेतला. परिसरातील नागरिकांनी दिंडी पाहण्यासाठी गर्दी केली होती. नागरिकांनी दिंडीत प्रत्यक्ष सहभागी होण्याचा आनंद लुटला. संपूर्ण गावातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक घोषणा देत नागरिकांमध्ये जन जागृती निर्माण केली. औषधी वनस्पतींचे जतन करण्यासाठी हस्तलिखित प्रती वाटून त्यांचे महत्त्व सांगवी परिसरातील नागरिकांना सांगण्यात आले.

Google Ad

विविध फलकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी वृक्षसंवर्धनाच्या घोषणा दिल्या दिंडी मार्गातील विविध मान्यवरांना विद्यार्थ्यांच्या हस्ते छोटे रोप भेट स्वरूपात देण्यात आले *मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीचे *संस्थापक विश्वस्त मा.शामरावजी कदम साहेब *व पिं. चिं. म.न.पा.चे माजी महापौर सौ. माई ढोरे* यांनी दिंडीतील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. *सौ. लबडे सविता , सौ. मोरे सुप्रिया व श्री. नंदू जाधवसर* यांनी सर्व दिंडीचे संयोजन केले.*

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!