सांगवी बोपोडी या मुळा नदीवरील पुलाचे व जोड रस्त्याचे डिझाईन बदलुन … महापौरपदाला शोभेल असा प्रकल्प सांगवीकरांना द्यावा – प्रशांत शितोळे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१८जून) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महापौरांच्या प्रभागात निदान एक तरी प्रकल्प होऊ द्या अशी मागणी करणारे निवेदन पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात प्रशांत शितोळे यांनी म्हटले आहे की, सांगवी येथे मुळा नदीवर शितोळे परिवाराने खाजगीरित्या वाटाघाटी करून पूल बांधण्याची परवानगी दिल्याने महानगरपालिकेने या जागेतून पुलाला जोड रस्ता व पुढे पुणे मनपा हद्दीत शासकीय जागा घेऊन पुणे विद्यापीठालगत असणाऱ्या औंध -स्पायसर रस्त्याला जोडणारा रस्ता प्रस्तावित केला आहे.

आज हा प्रकल्प चालू होणार यासाठी समाधान आहे. परंतु अत्यंत साध्या पद्धतीने डिझाईन केलेल्या रस्ता व पुलाला आमचा अक्षेप असून त्याकरिता काही सूचना सुद्धा आहेत त्याची अंमलबजावणी आपणाकडून व्हावी व या करिता योग्य वाटल्यास सदर निविदा फेररचना होऊन पुन्हा करावी म्हणून विनंती आहे.

▶️प्रशांत शितोळे यांनी सुचविले हे बदल आणि केल्या या मागण्या :

• सांगवी-बोपोडी हा मुळा नदीवरील प्रस्तावित पुल पुणे व पिंपरी चिंचवड या दोन शहरांच्या हद्दीवर आहे. त्यामुळे या भव्यता आज रोजी सल्लागारांनी केलेल्या डिझाईन मध्ये दिसून येत नाही.

• पुणे विद्यापीठालगत सदर पूल जोडला जाणार असल्याने विद्येचे माहेरघर व औद्योगिक नगरी या कॉमन थीमवर फुलाचे डिझाईन असावे.

• पिंपरी चिंचवड मध्ये अंदाजे दोनशे मीटर व पुणे हद्दीत अंदाजे 900 मीटर असा जोड रस्ता असून या जोड रस्त्यावर कोणताही आकर्षकपणा असेल अशी तरतूद निविदेनुसार दिसून येत नाही.

• पुणे हद्दीत पन्नास वर्षे ते दीडशे वर्षे वयाची झाडे या रस्त्यालगत असून त्याची भव्यता व आकर्षकपणा जपण्यासाठी सल्लागाराने कोणताही प्रयत्न केलेला दिसून येत नाही.

• स्मार्ट सिटी प्रमाणे रस्त्याचा प्रकार आकर्षक वेटिंग एरिया, गझेबो सिटिंग, ओपन जीम नदीलगत संरक्षण भिंत, आकर्षक म्युरल अशाप्रकारे काम असावे.

• स्मार्ट सिटी प्रमाणे खोदाई करून पी क्यू सी डिझाईन प्रमाणे रस्ता व अर्बन डिझाईन असावे व त्या डिझाईन मध्ये रोड जंक्शन, चौक सुशोभीकरण, संरक्षण भिंत असावी.

▶️काय असावेत बदल, अशी आहे मागणी :
प्रत्यक्ष पुलाचे डिझाइन अत्यंत साध्या पद्धतीचे असून पिंपरी चिंचवड पुणे या दोन शहराचा मध्य म्हणून पुलाचा आकर्षकपणा व ड्रॉइंग, डिझाईन याच्यात दिसून येत नाही. यासाठी दोन्ही बाजूला मुबलक जागा असल्याने तसेच ब्ल्यु लाईनचा विचार करता Suspension Bridge with cable stayed याचा विचार होऊ शकतो का?

अशी मागणी करणारे निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले आहे व यावर विचार व्हावा अशी मागणी केली आहे.

यावेळी बोलताना प्रशांत शितोळे म्हणाले, ” पिंपरी चिंचवड शहर हे रस्ता, पूल, ग्रेड सेपरेटर, उड्डाणपूल यासाठी प्रसिद्ध आहे व त्याचा विसर पडलेला आहे हे या कामात दिसून येते. या परिसरातील निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना कदाचित कायमस्वरूपी होणाऱ्या अशा सुविधेला आकर्षकपणा, मजबूतपणा असावा असे वाटत नसावे. परंतु, प्रशासन म्हणून व शहराला आकर्षकपणा देणारे इंजिनियर म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाला भव्यता, आकर्षकपणा व मजबूतपणा या दृष्टीने नव्याने बनवावे हीच अपेक्षा.

सल्लागाराने या परिसरातील हिरवाई व मुळा नदीचा आकर्षकपणा याचा कोणताही आकर्षकपणा प्रस्तावित डिझाईन मध्ये रेखाटला नाही हे सर्व काम केवळ आणि केवळ एकदाच होणार आहे हे लक्षात घ्यावे व त्याप्रमाणे बदल व्हावेत. सदर पूल एकदाच होणार आहे त्यामुळे केवळ पूल केला अशी पाठ थपवून घेताना केवळ आम्हीच असा आकर्षक पूल केला असे सत्ताधाऱ्यांनासुद्धा सांगता आले पाहिजे. ज्याप्रमाणे प्राधिकरणाने रावेत बंधारा येथील संत तुकाराम महाराज पूल ज्याला अनेकजण बास्केट ब्रिज म्हणतात व नागरिकही आकर्षकपणाने पूल पाहण्यासाठी जातात तशा पद्धतीचे काहीसे वेगळे डिझाईन असण्याची अपेक्षा आहे.

विनाकारण करायचा म्हणून रस्त्यावर पूल करू नका. आजच्या शहराच्या विकासाला शोभेल असा करावा किमान सध्या शहराचे प्रथम नागरिक असणारे महापौर या प्रभागाचे आहेत, याचा विचार करून तरी त्यांच्या पदाला शोभेल व परिसराचे आकर्षण होईल, असा हा पूलाचा प्रकल्प करावा असा निशाणा आयुक्तांच्या खांद्यावरून माजी नगरसेवक ‘प्रशांत शितोळे’ यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

16 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago