Google Ad
Uncategorized

खाकी वर्दीला सलाम …. अनोखे प्रसंगावधान आणि कर्तव्य तत्परता दाखवत तरुणाचे प्राण वाचवणाऱ्या समीर कदम यांचा अप्पा रेणूसे मित्र परिवाराच्या वतीने सत्कार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ ऑक्टोबर) : आत्महत्येच्या प्रयत्नात इमारतीच्या थेट चौथ्या मजल्यावरून एका व्यक्तीने उडी मारल्यानंतर अचूक प्रसंगावधान राखून पोलिसांनी व बीट मार्शल आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी त्याला अतिशय धाडसाने आणि जीव धोक्यात घालून अलगदरीत्या झेलले आणि त्याचा जीव वाचवण्याचा महापराक्रम केला. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम आणि बिट मार्शल यांनी ही कामगिरी केली.

त्यांची कर्तव्य तत्परता आणि प्रसंगावधान लक्षात घेऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी म्हणून ऐश्वर्य कट्ट्याच्या वतीने त्यांचा आज शिंदेशाही पगडी, शाल, मोत्याची माळ , पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

Google Ad

यावेळी अप्पा रेणूसे, विजूशेठ जगताप, नमेशशेठ बाबर, विलासराव भणगे ,अड.दिलीप जगताप, नेमीचंद सोळंकी, डॉ. देविदास शेलार , युवराज रेणुसे, पांडुरंग मरगजे, सचिन शिंदे , नितीन रांजणे, मयुर बोंबले हे उपस्थित होते .

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!