Editor Choice

Pune : पुण्यात ‘सैराट’ बहिणीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या!

महाराष्ट्र 14 न्यूज : प्रेमसंबंध असल्याच्या रागातून दोन अल्पवयीन मुलांनी एका १७ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याच्या वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला असून यामध्ये आयान जावेद घानपुरे (१७) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

नेमके काय घडले?

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार; वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या आयन घानपुरे या तरुणाचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याची माहिती मुलीच्या भावांना समजली होती. यावरुन त्यांच्यात आधी भांडण देखील झाली होती. पण, त्यांनी हे भांडण मिटवण्यासाठी प्रयत्न देखील केले.

दरम्यान, आयान याला सिगारेट ओढवण्याची सवय होती. त्यामुळे या दोघा अल्पवयीन मुलांनी त्याला सिगारेट ओढण्यासाठी एम्प्रेस गार्डन परिसरात नेले. आयानखाली बसून सिगारेट ओढत होता. तिच संधी साधत त्यातील एकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्याचा जीव जाईपर्यंत त्याच्यावर चाकूने वार केले. जीव गेल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी त्याचा मृतदेह जवळच असणाऱ्या कॅनॉलमध्ये टाकला आणि तिथून पळ काढला. अशाप्रकारे खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी नाना पेठेत या दोघांनाही फिरत असताना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी खून केल्याची कबुली दिली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago