Google Ad
Uncategorized

रावेत गावातील समाजिक कार्यकर्ते, प्रगतशील बागायतदार कै.श्री स्वामी [ काका] नथू भोंडवे यांचे दुःखद निधन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : पुणे मनपाचे माजी महापौर दत्तात्रय गायकवाड यांचे म्हेवणे, जयंत उर्फ आप्पा बागल मा. नगरसेवक, पिं.चिं. मनपा, सचिव, महाराष्ट्र वारकरी महामंडळ यांचे सासरे, मा. नगरसेवक गणेश भोंडवे व भाजपचे युवा नेते दीपक भोंडवे यांचे चुलते रावेत गावातील समाजिक कार्यकर्ते आणि प्रगतशील शेतकरी कै.श्री स्वामी [ काका] नथू भोंडवे यांचे आज सकाळी वयाच्या ७८ वर्षी आज सोमवार दि.१५ मे रोजी दुःखद निधन झाले.

स्वामी (काका) भोंडवे यांच्यावर पवना नदीकाठी रावेतगाव स्मशान भूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी त्यांच्या अंत्यविधी करीता पिंपरी चिंचवड शहरातील तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक नातेवाईक, प्रतिष्ठित मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

त्यांचा दशक्रिया विधी दि.१८ मे रोजी सकाळी ०८.०० मि. पवना नदीकाठी, रावेत गाव येथे होणार आहे. यावेळी आसाराम महाराज बढे आळंदी यांची प्रवचन सेवा होणार आहे.

भंडारा डोंगर येथे साकारत असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या मंदिरास कै.श्री स्वामी [ काका] नथू भोंडवे यांनी भरीव अशी देणगी देऊन मोठा हातभार लावला होता.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!