Google Ad
Uncategorized

छगन भुजबळ यांचा होणार करेक्ट कार्यक्रम … मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व जरांगे-पाटील यांच्याकडे देण्याचा ठराव

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१४ नोव्हेंबर) : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे-पाटील यांच्याकडे देण्याचा ठराव मराठा आरक्षण हक्क परिषदेत करण्यात आला. तसेच राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना मतदान न करण्याचा ठरावही करण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे- पाटील यांनी राज्यभरात रान उठविले आहे. त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे दोनदा आमरण उपोषण करून मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारला गंभीर दखल घेण्यास भाग पाडले आहे. राज्यभर दौरा करून त्यांनी मराठा समाजामध्ये जनजागृती केली आहे. मराठा समाजात एकीसाठी आवाहन केले आहे. राज्यात मराठा समाजामधून जरांगे – पाटील यांच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू लागला आहे. या पार्श्वभूमीवर जरांगे-पाटील यांच्याकडे आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व देण्याचा ठराव करण्यात आला आहे.

Google Ad

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात मराठा समाजामधून नाराजी आणि रोष व्यक्त करण्यात येत आहे. भुजबळ यांच्या येवला मतदारसंघातून त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. येवल्यातील अनेक कार्यलयातून भुजबळांचा फोटो मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी हटविला आहे.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!