Categories: Editor Choice

महाराष्ट्र पोलिसांवरील रत्नदीप कांबळेंच … ‘भाऊ आपला कायम वजनात’ गाण सोशल मिडियावर व्हायरल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र पोलिसांवरील रत्नदीप कांबळेंच ‘भाऊ आपला कायम वजनात’ गाण सोशल मिडियावर व्हायरल झाले आहे.

आशय प्रधान आणि ठेका धरायला लावणारी गाणी ही प्रदर्शित होताच काही तासांतच व्हायरल होतात. नुकतेच Rex studio रेकॉर्ड लेबल प्रस्तुत व संचालक रत्नदीप कांबळे यांनी संगीतबद्ध केलेले ‘भाऊ कायम वजनात’ हे गाणं सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. हे गाण महाराष्ट्र पोलिस यांना समर्पित असून यामध्ये रत्नदीप कांबळे यांनी इंस्टाग्राम रिल्स वरील कलाकार दीपक गीते आणि टीम’ ला संधी दिली आहे.

यापूर्वी रत्नदीप कांबळे यांची ‘अहो शेठ लई दिसानं झालीया भेट लावणी ,अंगार भंगार नाय र्रर्रर्र, विठू माउली, लावा ताकत अशी अनेक गाणी तूफान व्हायरल झाली आहेत. ‘भाऊ कायम वजनात’ हे गाणं ते घेऊन आले आहेत. या गाण्याची संकल्पना आणि संगीत हे रत्नदीप कांबळे यांच आहे. बोल कमलेश गायकवाड यांचे असून गायक मधुर शिंदे यांनी हे गाण गायलं आहे.  या गाण्याविषयी बोलताना रत्नदीप कांबळे म्हणाले, तरुणाईला भावतील अशी अनेक गाणी आम्ही Rex studio रेकॉर्ड लेबल अंतर्गत प्रस्तुत केली आहेत. तसेच कोरोना काळानंतर लावणी विश्वात लावणी कलाकारांना एक आगळी वेगळी लावणी ‘अहो शेठ लई दिसानं झालीया भेट’ या गाण्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर आम्ही ‘भाऊ आपला कायम वजनात’ हे गाण घेवून आलो आहोत. हे गाण महाराष्ट्र पोलिसांना समर्पित असून यातील कलाकार हे इंस्टाग्राम वरील ‘रील स्टार’ आहेत. सोशल मिडियावर हे गाण व्हायरल झाल असून अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

Rex studio रेकॉर्ड लेबलच्या वाटचाली बद्दल बोलताना रत्नदीप कांबळे म्हणाले, संगीताची पार्श्वभूमी नसताना केवळ संगीताची आवड म्हणून मी संगीत शिकायला सुरूवात केली. सुरूवातीला डी जे रेक्स म्हणून अनेक गाणी रिमिक्स केली. त्यानंतर ‘Rex studio रेकॉर्ड लेबल’ची स्थापना केली. अवघ्या सहा वर्षांच्या प्रवासात Rex studio ने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. या प्रवासात गायक मिलिंद शिंदे, उत्कर्ष शिंदे,गीतकार राहुल सुर्यवंशी,मधुर शिंदे, सौरभ साळुंखे, सोनाली सोनावणे अशा दिग्गज गायकांसोबत काम केले. तसेच सौरभ देशपांडे, ऋषी बी,आनंद पायाळ आणि अनुराग कांबळे यांची साथ मिळाली.सध्या अनेक नवीन प्रोजेक्ट वर काम चालू असून लवकरच चित्रपट, वेब सिरिज मधेही प्रेक्षकांना गाणी ऐकायला मिळतील.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

22 hours ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

1 day ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago