Ranjangaon : प्रियकराकडून गर्भवतीप्रेयसीची हत्या … रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये झाला वाद!

महाराष्ट्र 14 न्यूज : रांजणगावात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यातील प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. प्रेयसीच्या गरोदरपणावरुन सुरु असलेल्या वादातून प्रियकराने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. रांजणगाव औद्योगिक वसाहत परिसरातील कारेगाव येथे संबंधित जोडपे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. किरण फुंदे असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याने प्रेयसी सोनामनी सोरेन हिची हत्या केल्याचा आरोप आहे.

प्रेयसीचा गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपी पोलीस स्टेशनला स्वतः हजर झला. आपणच आपल्या गर्लफ्रेंडचा खून केल्याची कबुली त्याने दिली. मला फाशी द्या, अशी मागणीही आरोपी प्रियकर किरण फुंदे याने रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये केली. कारेगावमध्ये किरण फुंदे आणि सोनामनी सोरेन हे दोघे एकत्र रहात होते. सोनामनी गर्भवती झाल्याने दोघांमध्ये वाद उद्भवला.

गर्भ वाढवायचा नसल्याचे प्रियकर किरण याचे म्हणणे होते. यावरुन दोघांमध्ये वाद सुरु झाला. याच वादातून किरणने राहत्या घरी सोनामनीचा गळा आवाळून हत्या केली आणि घराला बाहेरुन कुलूप लावून तो थेट रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. हत्या केल्याची कबुली देत आपण केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून फाशी द्या, असे लिहिलेला कागद त्याने पोलिसांकडे सुपूर्द केला.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago