महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ ऑगस्ट) : पिंपरी चिंचवड सोशल फाउंडेशन आयोजित रौप्य महोत्सवी स्वरसागर सांस्कृतिक महोत्सव येत्या शनिवारपासून रंगणार असून नृत्य, गायन व वादनाच्या बहारदार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या या वेळच्या स्वरसागर महोत्सवात शनिवारी म्हणजे १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून कार्यक्रम सुरु होणार आहेत.
शनिवारी सुरुवातीला सायंकाळी सहा वाजता बॉलिवूड क्लासिकल गीते संदीप उबाळे, अली हुसेन, अभिलाषा चेल्लम व संपदा गोडबोले सादर करतील. त्यांना केदार परांजपे आणि सचिन जांभेकर साथसंगत करतील. त्यानंतर नृत्यकला मंदिरचे राष्ट्रीय स्तरावरील यशस्वी विद्यार्थि गुरु तेजश्री अडिगे यांचे दिग्दर्शनाखाली भरतनाट्यम नृत्यरंग सादर करतील. तसेच पिंपरी चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उदघाटन होईल. पुढील सत्रात वाद्यसंगीत सादर करण्यात येईल. शशांक सुब्रह्मण्यम – बासरी, पत्री सतीश कुमार -मृदुंगम, ओजस अढीया – तबलावादन सादर करतील.
महोत्सवाच्या दुस-या दिवशी म्हणजे शनिवारी (13 ऑगस्ट) सायंकाळी जलदिंडी प्रतिष्ठान आयोजित पर्यावरणावर आधारित समूह गायनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर नुपूर नृत्यालयाच्या डॉ. सुमेधा गाडेकर व विद्यार्थिनी तत्वम – कथक व त्यापलीकडे हे नृत्य सादरीकरण करतील. त्यानंतर ओ गानेवाली हा दादरा, ठुमरी व गझल यावर आधारित संगीतमय कार्यक्रम अवंती पटेल व ऋतुजा लाड सादर करतील.
महोत्सवाच्या समारोपाच्या दिवशी शब्दरंग ज्येष्ठ नागरिक कला साहित्य कट्टा प्रस्तुत स्वच्छता अभियान आणि प्लास्टिक मुक्त भारत या विषयावरील पथनाट्य चंद्रशेखर जोशी आणि सौ. ज्योती कानेटकर सादर करतील. नृत्यशारदा कथक मंदिराच्या स्नेहल सोमण व विद्यार्थिनी नृत्यांजली प्रस्तुत करतील. त्यानंतर आकार प्रस्तुत अभिवादन भारतीय स्वातंत्र्याला हा समूह गीतांचा कार्यक्रम होईल. स्वरसागर महोत्सवाची सांगता विदुषी मंजुषा पाटील यांच्या शास्त्रीय गायनाने होईल.
याशिवाय स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन मिळावे म्हणून 7 ते 15 ऑगस्ट दरम्यान शास्त्रीय गायन, वादन व नृत्याच्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांसाठी 15 वर्षांखालील व 15 वर्षांवरील असे दोन वयोगट आहेत. सर्वप्रथम नोंद करणाऱ्या 20 स्पर्धकांनाच या स्पर्धेत सहभागी होता येईल. त्यासाठी 7743833644 व 9923409116 या क्रमांकावर तसेच swarsagar2019@gmail.com या इमेलवर संपर्क करावा.
पिंपरी चिंचवडमधील संगीत रसिकांच्या मर्मबंधातील ठेव असलेला स्वरसागर महोत्सव यंदा 25 व्या वर्षात पदार्पण करणार आहे.
पिंपरी चिंचवड शहराची शान असलेल्या स्वरसागर महोत्सवाचे कोविड काळात देखील यशस्वी आयोजन करून ही आपली सांस्कृतिक परंपरा जपली होती. येथे अनेक दिग्गज कलाकारांनी आपली कला सादर केली आहे. यंदा देखील अनेक नामवंत कलाकार येथे येऊन आपली कला रसिकांसमोर सादर करणार आहेत. त्यामुळे स्वरसागर महोत्सवाला येऊन कलाकारांना भरभरुन दाद द्या असे आवाहन यानिमित्ताने महोत्सवाचे सांस्कृतिक समन्वयक प्रवीण तुपे यांनी केले आहे. पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी व शरयूनगर मित्रमंडळ, प्राधिकरण यांचे सहकार्य या महोत्सवाला लाभले आहे. सर्व कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहेत.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…