Categories: Uncategorized

कर्नाटकात राहुल गांधी हिरो !काँग्रेसने भाजप आणि जेडीएसचे तोंड केले बंद …

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : कर्नाटकात काँग्रेसचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले आहे. येथे 10 मे रोजी 224 जागांसाठी 2,615 उमेदवारांना 5.13 कोटी मतदारांनी मतदान केले. आज (13 मे रोजी) निवडणुकीचे निकाल येत आहेत. आतापर्यंतच्या मतमोजणीत काँग्रेस पक्षाला 136 हून अधिक जागांवर आघाडी मिळताना दिसत आहे.

र्नाटकात किंगमेकरची भूमिकेत असलेल्यांचं दुकान बंद झालं आहे. कर्नाटकने काँग्रेसला पूर्ण बहूमत दिलं आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस 136 जागांवर आघाडीवर आहेत. तर  भाजपने  65 जागा जिंकल्या आहेत तर किंगमेकरच्या भूमिकेत असलेला जेडीएस 19 जागांवर विजय  मिळवला आहे. त्यामुळे काँग्रेस भाजप आणि जेडीएसचे देखील तोंड बंद केले आहे.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या भारत जोडो यात्रेमुळे विजयाचे शिल्पकार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र या विजयात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विसरून चालणार नाहीये.

भाजपला सत्तेतून खाली खेचून काँग्रेसला मिळवून दिलेल्या या विजयामागे पक्षाच्या 2 दक्षिण भारतीय राजकारण्यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. एक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि दुसरे काँग्रेसचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार.

महत्वाचे म्हणजे मल्लिकार्जुन खर्गे यांची गेल्या वर्षीच काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. खर्गे काँग्रेस अध्यक्ष बनल्याने कर्नाटकात पक्षाला संजीवनी मिळाल्याचं पाहायला मिळालं. खर्गे हे 9 वेळा कर्नाटकचे आमदार राहिले असून त्यांचा येथील राजकारणात विशेष प्रभाव आहे. मात्र त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली नाही ही वेगळी गोष्ट आहे, पण पक्षाने त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं आणि पक्षाने कर्नाटकात सत्ता काबीज केली आहे. खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसला दुसऱ्या राज्यात सत्ता मिळाली आहे.

▶️जुन्या व स्थानिक निष्ठावंत नेत्यांना डावलल्याचा भाजपला फटका?;

जुन्या निष्ठावंत स्थानिक नेत्यांना डावलल्याचा किंवा त्यांच्या नाराजीचा फटका भाजपला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बसल्याचे दिसून येत आहे.आगामी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठीही हा इशारा असून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला यातून धडा घ्यावा लागणार आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा – नगरसेवक माऊली जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची मागणी

वायसीएममधील औषधटंचाई तातडीने दूर करा - नगरसेवक जगताप आयुक्तांना निवेदन; सात दिवसांत कार्यवाहीचा अहवाल देण्याची…

3 weeks ago

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!

ब्रेकिंग न्यूज | वाकड वाहतूक पोलिसांची धडाकेबाज कारवाई! व्हायरल रीलमधील फॉर्च्युनर मालकावर अखेर गुन्हा दाखल!…

1 month ago

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला ‘प्रगती’ प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी ” – आमदार शंकर जगताप

जिल्हा रुग्णालयाच्या २०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी सेवेला 'प्रगती' प्रकल्पांतर्गत मंत्रिमंडळाची मंजुरी " - आमदार शंकर जगताप…

1 month ago

जिल्हा रुग्णालयातून ‘सुपर स्पेशालिटी’ आरोग्यसेवेचे नवे पर्व, … जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना ठरणार वरदान- आमदार शंकर जगताप

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी चिंचवड  २४ ऑगस्ट (प्रतिनिधी):  जिल्हा रुग्णालयाचा विस्तार करून ते अत्याधुनिक सुपर…

2 months ago

वाकड येथील काळाखडक परिसरात स्कूल बसला आग … अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली

महाराष्ट्र 14 न्यूज, पिंपरी, दि. २० ऑगस्ट २०२६:* पिंपरी चिंचवड शहरातील वाकड परिसरातील काळाखडक, भूमकर…

2 months ago