Google Ad
Uncategorized

पहिल्यांदाच खासदार झालेल्या पुण्याच्या मुरलीधर अण्णांनी घेतली केंद्रीय मंत्रीदाची शपथ

महाराष्ट्र व14 न्यूज, (दि.०९ जून) : आज भारताच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस आहे. नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा भारताच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात हा दैदिप्यमान सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मोदींना गोपनीयतेची शपथ दिली. विशेष म्हणजे,यावेळी नरेंद्र मोदींसोबतच 69 खासदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी पहिल्यांदा च निवडून आलेले पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी ही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी भारताच्या शेजारील देशांच्या प्रमुखांसह हजारो मोदी समर्थकांनी उपस्थिती होते.

पुण्याचे खासदार आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात काम करण्याची संधी मिळाली आहे.

Google Ad

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठा समाज तसेच विरोधकांनी पश्चिम महाराष्ट्रात मिळवलेले स्थान लक्षात घेत मुरलीधऱ मोहोळ यांना केंद्रीय मंत्रिमंडळात घेण्याचा निर्णय भाजप पक्षश्रेष्ठींनी घेतला . मोहोळ यांना पंतप्रधान कार्यालयातून आज (दि.९) सकाळी संपर्क साधण्यात आला. त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय घेतला. याचा फायदा पुण्यातील आणि परिसरातील राजकीय क्षेत्रावर चांगल्या पद्धतीने पडणार आहे असे भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे.

कोण आहेत मुरलीधर मोहोळ?

मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून काम केलं. भाजपमध्ये त्यांनी बूथ प्रमुख म्हणून कामाला सुरुवात केली. नंतरच्या काळात भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष आणि सचिव म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. मोहोळ हे गेल्या ३० वर्षांपासून संघटनेत कार्यरत आहेत. पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी काम केलं. पश्चिम महाराष्ट्रात भाजप पक्ष वाढवण्यासाठी आणि मराठा समाजातील नेत्याला संधी देण्याच्या भूमिकेतून भाजपने मोहोळ यांना केंद्रात घेतलं असल्याचं म्हटलं जात आहे.

पुणे महानगरपालिकेच्या सभागृहातून खासदार होऊन थेट केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणारे पहिलेच पुण्याचे माजी महापौर म्हणून आता मुरलीधर मोहोळ यांची नोंद झाली.महापालिकेच्याच सभागृहातून अनिल शिरोळे, गिरीश बापट खासदार झाले पण त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला नव्हता. तो मान मुरलीधर आण्णा ना मिळाला.

मंत्रिमंडळात इतके मंत्री असणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन टीममध्ये 30 कॅबिनेट मंत्री, 5 स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री आणि 36 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. मंत्रिमंडळात 27 ओबीसी, 10 एससी, 5 एसटी, 5 अल्पसंख्याक मंत्री असतील.

Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!