Categories: Editor ChoicePune

Pune : कथित पत्नीच्या छळाला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या … प्रेमात अडकवून केलं होतं लग्न

महाराष्ट्र 14 न्यूज : तरुण वयात कोण काय करेल सांगता येत नाही, अशीच घटना पुण्यातील कोंढवा परिसरात घडली आहे, आपले लग्न झालेले असताना त्याची माहिती लपवून एका तरुणीने तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरच्यांना माहिती न देता या दोघांनी रजिस्टर लग्न देखील केले. त्यानंतर या तरुणीने संबधित तरुणाचा मानसिक छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली.

कोंढवा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणाच्या कथित पत्नीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तरुणाच्या काकाने याबाबत कोंढवा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना उंड्रीमध्ये २८ जूनला घडली होती. त्यावेळी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली होती. याचा तपास करून पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली.

तरुण आणि तरुणीचे पाच वर्षापूर्वी प्रेमसंबंध जुळले होते. त्यातून त्यांनी गुपचूप रजिस्टर लग्न केले होते. मात्र, त्यांनी ही बाब आपल्या नातेवाईकांना सांगितले नाही. ते दोघेही आपापल्या घरी राहात होते. ते दोघेही बाहेर भेटायचे. या भेटीदरम्यान त्यांच्यात शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. या तरुणीचे अगोदरच लग्न झाले होते. असे असताना तिने या तरुणाला फसवून रजिस्टर लग्न केले होते.

या तरुणाला तक्रार करण्याची धमकी देऊन ती वेळोवेळी त्याच्याकडून पैसे घेत होती. या तरुणीच्या नातेवाईकांना याची माहिती मिळाल्यावर ते देखील या तरुणाला मानसिक त्रास देत होते. या तरुणाच्या घरच्यांना याची माहिती नसल्याने त्यांनी त्याचे नात्यात लग्न ठरविले होते. ही गोष्ट त्याच्या कथित पत्नीला समजल्यावर तिने त्याला पळून जाण्यासाठी दडपण आणले.

पळून आला नाही तर सर्व उघड करण्याची धमकी तिने दिली होती. याला कंटाळून या तरुणाने साखरपुड्याच्या आदल्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली. या गुन्ह्याचा तपास करीत असताना या तरुणाच्या मित्रांकडून त्याचे रजिस्टर लग्न झाल्याची माहिती मिळाली. त्यावरुन घटनेच्या दिवशी या तरुणीचे पाच ते सहा फोन या तरुणाला आले होते, हे चौकशीतून समोर आले होते.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago