Categories: Editor Choice

Pune : लघवीला गेला अन् ९७ लाखांना मुकला … पुण्यातील व्यावसायिकासोबत घडली विपरीत घटना!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ ऑक्टोबर) : पुण्यातील हडपसर परिसरात एक विचित्र घटना समोर आहे. येथील एका व्यावसायिकाला लघवीला जावून येईपर्यंत तब्बल 97 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. मालक गाडीतून लघूशंकेसाठी उतरल्यानंतर, गाडीत ठेवलेले 97 लाख रुपये घेऊन चालक फरार झाला आहे.

संबंधित घटना पुण्यातील कल्याणीनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

विजय हुलगुंडे असं फरार आरोपी चालकाचं नाव असून तो कोंढवा परिसरातील रहिवासी आहे. याबाबत 50 वर्षीय ड्रायफ्रूट्स व्यावसायिकानं हडपसर पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. आरोपी हुलगुंडे हा मागील आठ महिन्यांपासून फिर्यादी व्यावसायिकाकडे चालक म्हणून काम करत होता. दरम्यान आरोपीनं फिर्यादीचा विश्वास संपादन देखील केला होता. पण सोमवारी 97 लाख रुपयांची रक्कम बघून चालकानं व्यावसायिकाला गंडा घातला आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

1 day ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

2 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

2 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

5 days ago

महायुतीच्या विजयासाठी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा शहरात बैठकांचा धडाका पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या १०० हून अधिक नमो संवाद सभा

महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…

1 week ago