Categories: Education

आळंदीला निघालेल्या वारकऱ्यांना पिक – अपची धडक , भीषण अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू , 20 जखमी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ नोव्हेंबर) :कार्तिकी एकादशीला आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पिक अप गाडी शिरल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन वारकऱ्यांचा मृत्यू झाला आहे तर 20 वारकरी जखमी झाले आहेत.

कान्हे फाटा येथे हा अपघात झाला आहे. अपघातातील जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर आरोपी पिक अप चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही दिंडी खालापूर येथून आलंदीकडे जात होती त्यावेळी हा अपघात झाला. कामशेतच्या महावीर हॉस्पिटलमध्ये जखमींवर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

▶️उपचारादरम्यान मृत झालेल्या वारकऱ्यांची नावे 1) सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, खालापूर, रायगड 2) जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड जुना पुणे मुंबई महामार्गावर कार्तिकी एकादशीला आळंदीकडे खालापूरच्या उंबर गावातील वारकऱ्यांच्या पायी दिंडीला कान्हे फाटा येथे भीषण अपघात झाला आहे.

आळंदीकडे चाललेल्या पायी दिंडी सोहळ्यात पिकअप गाडी घुसल्याने दिंडीतील सुमारे 20 ते 22 जण गंभीर जखमी झाले असून, दोन जणांचा मृत्य झाला आहे.

सविता वाळकू येरभ (वय 58), रा. उंबरे, खालापूर, रायगड आणि जयश्री आत्माराम पवार (वय 54), रा.भूतवली, ता. कर्जत, जि रायगड अशी मयतांची नावे उंबरे,ता.खालापूर, जि.

रायगड येथील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित संत ज्ञानेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्यातील हे वारकरी होते. मुंबई पुणे महामार्गावरून पुण्याच्या दिशेला वारकरी मार्गस्थ होत असताना कान्हे फाट्याजवळ मुंबईकडून भरधाव वेगाने आलेली पिकअप गाडी पायी दिंडीच्या मधोमध घुसली. त्यामुळे दिंडीत एकच कल्लोळ झाला, तर जखमी रस्त्यावर विव्हळत होते. या अपघातात दिंडीत सुमारे 200 वारकरी असल्याची माहिती वडगांव मावळ पोलिसांनी दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपचा “मेरा बूथ सबसे मजबूत”चा संकल्प, … बूथ स्तरावर 51 टक्के मताधिक्य जिंकण्याचा भाजपचा निर्धार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना…

7 hours ago

मतदान जनजागृतीत व्यापा-यांचा सहभाग तसेच नवोदीत मतदार आणि प्रथमच मतदानासाठी मूकबधिर पहिलवान उत्सुक….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७) : पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या नियंत्रणाखाली…

2 days ago

मतदान करताना वोटिंग कार्ड नसल्यास या १२ पैकी एक ओळखपत्र ग्राह्य धरणार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०७ मे) :आज (०७ मे) ज्येष्ठ नेते शरद पवार आणि काँग्रेसचे…

2 days ago

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

3 days ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

3 days ago