Categories: Editor ChoicePune

Pune : स्वारगेट पोलिसांमुळे मिळाले नगरसेविकेच्या मुलाचे दागिने

महाराष्ट्र 14 न्यूज : हाताला जखम झाल्यानंतर रुग्णालयातून उपचार घेउन रिक्षाने प्रवास करणा N या नगरसेविकेच्या मुलाचे रिक्षात विसरलेले तब्बल 1 लाख 80 हजाराचे दागिने मिळवून देण्यात स्वारगेट पोलिसांना यश आले आहे . त्यासाठी पोलिसांनी परिसरातील तब्बल 100 सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करुन रिक्षाचालकाचा शोध घेत दागिने मिळवून दिले आहेत .पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार , नगरसेविका कविता वैरागे यांचा मुलगा काल दुपारी बाराच्या सुमारास रिक्षातून प्रवास करीत होता .

त्यावेळी साडेचार तोळे दागिने असलेली पिशवी तो रिक्षामध्ये विसरला होता . त्याची किंमत जवळपास 1 लाख 80 हजार इतकी होती . दागिने विसरलेली माहिती वैरागे यांनी स्वारगेट पोलिसांना दिली . त्यानुसार स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई ज्ञाना बडे आणि मनोज भोकरे यांनी परिसरातील तब्बल 100 सीसीटीव्हीचे फुटेज तपासून रिक्षाचालकाचा मार्ग काढला . त्यानंतर रिक्षात असलेली दागिन्यांची पिशवी नगरसेविका कविता वैरागे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली . ही कामगिरी पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद , पोलीस कर्मचारी ज्ञाना बडे , मनोज भाकरे यांच्या पथकाने केली .

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago