Google Ad
Uncategorized

महाराष्ट्रात प्रथमच … पुणेकरांना पाहायला मिळणार लंडन ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट .. वाचा, कुठे आणि केव्हा

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.18 सप्टेंबर : डी. जे. अम्युजमेंट प्रस्तुत महाराष्ट्रात प्रथमच लंडन ब्रिज, युरोपियन स्ट्रीट एक्रिविशन भरवण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे नवनवीन संकल्पना आले आहेत. ज्यामध्ये लंडनचा ब्रिज आणि युरोपियन स्ट्रीट हे हुबेहुब चित्रांच्या माध्यमातुन पहावयास मिळणार आहे. आणि लंडन ब्रिज वरून जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

येथील शिवगोरक्ष ग्राउंड, कात्रज कोंढवा रोड, पुणे या ठिकाणी पहावयास मिळणार आहे. अशी माहिती जयप्रकाश, जयराज आणि वी नायर यांनी दिली. शुक्रवार दिनांक १९/०९/२०२५ रोजी सायं. ७ वाजता याचे उद्घाटन मा. नगरसेवक प्रकाशभाऊ कदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी आदी प्रमुख पाहुणे उपस्थित असणार आहेत. चित्रांच्या माध्यमातुन विद्युत रोषणाई करून पुरोप सिटी उभी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Google Ad

या ठिकाणी लहान मुलां मुलींपासून ते सर्व वयोगटातील लोक धमाल, मस्ती आणि मनोरंजन करणार आहेत. जायंट हिल, कोलंबस, ड्रॅगनट्रेन, ब्रेक डान्स, मोठा पाळणा आदींमध्ये आनंदाने राइड करू शकणार आहेत. तर मुलांसाठी पेडलबोट, जंपिंग, मिनी ट्रेन आदी अनेक मनोरंजक राइडस् आहेत.
घरगुती वस्तू, क्रीडा उपकरण, कुलींग भांडी, मुलांसाठी खेळणी आणि तयार कपडे हे सर्व एकाच छताखाली पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातुन मिळणार आहे. शिवाय पुस्तकांचाही स्टॉल आहे. ज्या ठिकाणी डिस्काउंटमध्ये पुस्तके खरेदी करता येणार आहेत.

याचबरोबर स्वादिष्ट खाद्यपदार्थ, स्लेक्स, पॉपकॉर्न, कॉटन कैंडी, सोलापुरी, पाणीपुरी, चाट, उटीचिल्ली, बज्जी, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, चिल्ली गोवि, मिरची भजी आदी खाद्यपदार्थ मिळणार आहे. शिवाय सेल्फीही काढता येणार आहे. तरी पुण्यामध्ये प्रथमच आलेल्या या नगरीत पुणेकरांनी आवश्य भेट दयावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच शुक्रवार दि. १९/९/२०२५ पासुन दररोज सांय ५ ते रात्री १० वाजेपर्यंत हे प्रदर्शन चालु राहाणार असून ते पहायला मिळनार आहे.

Ad3
ad2
ad1
Google Ad

About the author

Maharashtra14 News

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!