Categories: Editor ChoicePune

Pune : कोविड योद्यांशी नवनियुक्त पोलीस आयुक्त ‘अमिताभ गुप्ता’ यांचा मनमोकळा संवाद!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुणे शहरामध्ये कोरोनाचा कहर वाढत असतानाच नवीन पोलीस आयुक्तांना नवीन पदभार स्विकारताना पुणे शहर आयुक्तालयामधील पोलीस दलातील वाढत चाललेल्या कोरोना प्रसाराचे मोठे संकट उभे होते . कोरोनाच्या संकटाशी लढा देत असताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचारी हे कोरोना बाधित झालेले आहेत . नवीन पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता यांनी आपले नवीन कामकाजाची माहिती करुन घेत असतानाच आपल्या पुणे पोलीस कुटुंबातील कोरोनाग्रस्त झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांचेशी आज दिनांक २३ / ० ९ / २०२० रोजी सायंकाळी झूम मिटींगद्वारे मनमोकळा संवाद साधण्याचा एक आगळावेगळा उपक्रम राबविला .

सदरवेळी श्री . मितेश घट्टे , पोलीस उप आयुक्त , विशेष शाखा , पुणे शहर हे देखील उपस्थित होते . सदर झूम मिटींगमध्ये पोलीस आयुक्त श्री . अमिताभ गुप्ता यांनी १५० सक्रीय रुग्णांपैकी १३० कोरोना योद्ध्यांशी संपर्क साधला . त्यांनी हॉस्पिटल किंवा होम क्वॉरंटाईन असणाया पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेशी संवाद साधण्याला प्रथम प्राधान्य दिले . त्यावेळी कोणाच्या कुटुंबामध्ये सर्वजण बाधित तर कोणी रुग्णालयातून डिस्चार्ज होऊन नुकतेच घरी परतलेले , अशा सर्वांशी बोलताना कोरोना कधी झाला ? उपचार व्यवस्थित चालू आहेत का ? लवकर बरे व्हा अशी आपुलकीने विचारपूसही केली .

अशा मैत्रीपूर्ण व आपुलकीच्या संवादामुळे आपल्याला समजून घेणारा आणि आपल्या सुखदुःखात सामिल होणारा कुटुंब प्रमुख आपल्याला लाभला आहे अशी पुणे शहर पोलीसांमध्ये विश्वासाची भावना निर्माण झाल्याने अनेकांना गहिवरुन देखील आले . तसेच बरे झालेल्या पोलीसांच्या चेहावरील आनंदाच्या छटा पाहून , कोरोनाबाधित कुटुंबातील आईला जास्त त्रास देऊ नका अशी मिश्किल टिपणीसुद्धा केली . त्यामुळे नवीन आयुक्तांच्या वेगळया स्वभावछटेची ओळख झाली .

पोलीस कोविड योद्ध्यांशी संवाद साधताना नवनियुक्त पोलीस आयुक्तांनी आपल्या बहिणीचे उदाहरण देताना सांगितले की , आपली बहिणही डॉक्टर असून कोरोनाग्रस्तांच्या सेवेमध्ये व्यस्त असताना ती स्वतःदेखील कोरोनाबाधित झाली आहे व त्यामुळे तिची दोन्ही मुलेही कोरोनाबाधित झाल्याची आठवण त्यांनी आवर्जून सांगत कुटुंबाच्या स्वास्थ्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा सल्ला देत असताना घरच्यांची काळजी घ्या , मुलांची काळजी घ्या असे प्रेमळ सल्लेही दिले . श्री . गुप्ता यांच्या या उपक्रमामुळे पुणे शहर पोलीस दलामध्ये सकारात्मकतेची भावना निर्माण होऊन त्यांचे कार्यक्षमतेमध्ये निश्चितच वाढ होईल अशी पोलीस दलात प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

21 hours ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

2 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

5 days ago

‘गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन’ … अजित पवारांचा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सज्जड दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मावळ येथे सभा…

6 days ago