Categories: Uncategorized

पुणे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या विजयाकरीता एकवटला अप्पा रेणुसे आप्तेष्ट आणि मित्र परिवार

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ एप्रिल) : रेणुसे आप्तेष्ट आणि मित्र परिवाराच्या वतीने वाळवेकर लॉन्स येथे स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. त्या सोहळ्याला मा. श्री. मुरलीअण्णा मोहोळ यांची विशेष उपस्थिती होती. रेणूसे आप्तेष्ट व मित्रपरिवार या स्नेह मेळाव्याला मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. एकीच्या बळानेच आपण कोणत्याही क्षेत्रात परिस्थितीवर मात करून यश मिळवू शकतो. पुढील काही दिवसात विविध सभाद्वारे राजकीय प्रचाराची रणधुमाळी सुरू राहणार असली तरी एक कुटुंब या भावनेने सर्वांनी एकत्र काम करणे हेच महत्त्वाचे ठरणार आहे असे बोलत मुरलीधर मोहोळ यांनी सर्वांशी अतिशय आत्मीयतेने व आपुलकीच्या भावनेने संवाद साधला.

भाषाप्रभू डॉक्टर पंकज महाराज गावडे म्हणाले आजच्या परिस्थितीत विकास हाच महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे त्यामुळे जे चांगले आहे तेच पुढे जात राहणे महत्त्वाचे आहे सगळे एकत्र येऊन जेव्हा समाजात चांगले काम केले जाते तेच काम टिकते व समाजाला मान्य होते त्यामुळे या पुढील काळात सुद्धा आपण सगळेजण एकत्रितपणे काम करूया.

दीपकभाऊ मानकर म्हणाले, कोरोनाच्या काळात मुरलीअण्णांच्या घरातील 35 माणसं रुग्णालयात भरती असतानादेखील महापौर म्हणून त्यांनी केलेले काम लोकांच्या स्मरणात आहे. त्यामुळे त्या कामाचीच दखल घेतली जाईल असे वाटते. या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने चांगली सुरुवात केली आहे असे मेळावे पुणे शहरात आणखी होणे गरजेचे आहे.

पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर शेठ जगताप यांनी सुद्धा एकत्रित पणाचे फायदे किती आहेत व सध्याच्या परिस्थितीत सगळ्यांनी एक संघपणे राहणे हे जरुरीचे आहे हे आग्रहाने सांगितले.या वेळी सगळ्यांशी मनमोकळा संवाद साधत मा. मुरलीअण्णा मोहोळ यांनी स्नेहमेळाव्याला खरा अर्थ प्राप्त करून दिला.

स्नेह मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजीराव रेणुसे व प्रसिद्ध वस्ताद नरहरी चोरगे व सर्व मान्यवरांच्या हस्ते मुरलीधर मोहोळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर माझ्यासह आमदार भीमराव तापकीर ,दीपक भाऊ मानकर, पंकज महाराज गावडे, शंकर शेठ जगताप, बाबा मिसाळ, विजय शेठ जगताप, अजय शेठ खेडेकर, राजेंद्र शिळीमकर, महेश वाबळे, अशोक येनपुरे, व्यंकोजी खोपडे, रोहिदास उंदरे, दत्ता सागरे, अभय मांढरे, दिलीप काळोखे इत्यादी रेणुसे मित्रपरिवार उपस्थित होता. युवराज रेणुसे यांनी स्वागत केले, एड दिलीप जगताप यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली जितेंद्र भूरूक व दीपक भाऊ मानकर यांच्या बहारदार गीताने कार्यक्रम उत्तरोत्तर रंगात गेला.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

3 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

5 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago