Google Ad
Uncategorized

लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था (महाराष्ट्र राज्य) च्या … पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी ‘डॉ. देविदास शेलार’ यांची निवड

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ जुलै २०२३) : लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था ही संस्था भारतभर ग्राहक संरक्षणाचे काम करत आहे. त्यामध्ये उपभोक्ता संरक्षण कल्याण अधिकार अधिनियम १९८६/२०१९ प्रमाणे महाराष्ट्र राज्य यांच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ. देविदास शेलार यांची निवड करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यात आवड असणारे डॉ. देविदास शेलार हे समाजातील गोरगरीब रुग्णांना आपला हक्क मिळवून देण्याचे कार्य अनेक वर्षांपासून करत आहेत, मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता कक्ष यातही त्यांचे मोलाचे कार्य आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी पुणे जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये काम करण्यासाठी त्यांची पुणे जिल्हा उपाध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली असल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर मधुकर आमकर यांनी सांगितले

Google Ad

त्यांना मा. श्री. दिनकर मधुकर आमकर राष्ट्रीय अध्यक्ष, मा. कु. योगेश कृष्णा आस्कट महाराष्ट्र राज्य संघटक, मा. सौ. उमा ज्ञानेश्वर कांबळे सहसचिव महाराष्ट्र राज्य यांनी हे नियुक्ती पत्र दिले आहे. डॉ.देविदास शेलार हे पुणे जिल्यातील सर्व प्रकारच्या खरेदी -विक्रीच्या आणि सर्व विक्री पश्चात प्राप्त होणाऱ्या गैरव्यवहारांच्या तक्रारी बाबत संस्थेच्या वतीने अंमल बजावणी करतील. ग्राहकांच्या समस्या संदर्भात त्यांनी थेट यांच्याशी संपर्क साधावा, असे आहावान केले आहे.

ग्राहकांच्या हिताचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने 24 डिसेंबर १९८६ मध्ये ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी हा कायदा अंमलात आणला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून केंद्रीय ग्राहक संरक्षण परिषद तर ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी केंद्रीय स्तरावर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग तर जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच (जिल्हा मंच) स्थापन करण्यात आले.

Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!