महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१ एप्रिल) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन परीक्षा घ्यायचा घाट घातलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा नमुना समोर आला आहे. विद्यापीठातील परीक्षेसाठी 10 दिवस उरले असतानाही अजूनही विद्यार्थ्यांना वेळापत्रक देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या पालक आणि विद्यार्थ्यांवरील तणाव वाढला आहे.
पुणे विद्यापीठातील सत्र परीक्षेला अवघे 10 दिवस शिल्लक राहिले आहेत. तरी अजून विद्यापीठ प्रशासाने सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नियोजनात अडचणी येत आहेत.
आता 11 एप्रिलपासून सत्र परीक्षेला सुरुवात होईल. कोरोनाच्या संकटानंतर ही विद्यापीठातील पहिलीच सत्र परीक्षा आहे. तब्बल 6 लाख विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने ही परीक्षा देणार आहेत. मात्र, वेळापत्रक देण्यातील दिरंगाई पाहता प्रत्यक्ष परीक्षा सुरु झाल्यावर आणखी गोंधळ उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावर्षी मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेवेळीही असाच गोंधळ उडाला होता. परीक्षा सुरु झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाली नव्हती. त्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाबाहेर आंदोलन केले होते.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…
महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…
wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…