Categories: Editor ChoicePune

Pune : पुण्यातील फॅशन स्ट्रीटची राखरांगोळी …. महाभंयकर अग्नितांडवात साडेचारशे दुकानांचा कोळसा!

महाराष्ट्र 14 न्यूज : पुण्यातील नेहमी गजबलेल्या ठिकाणांपैकी एक असलेल्या महात्मा गांधी रोडवर असलेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटला आगीची नजर लागली. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास लागलेल्या आगीने फॅशन स्ट्रीट क्षणार्धात कवेत घेतलं आणि बघता बघता आगीच्या लोळांनी कापडाची दुकानं व गोदामानं वेढा घातला. साडेतीन तास सुरू असलेल्या या महाभंयकर अग्नितांडवात साडेचारशे दुकानांचा कोळसा झाल्याने फॅशन स्ट्रीटची राखरांगोळीच झाली आहे.
महात्मा गांधी रोडवर असलेल्या फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली.

आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या ५० जवानांसह १६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र, तोपर्यंत आगीने मार्केटमधील शेकडो दुकानं कवेत घेतली होती. आगीचे मोठं मोठे लोळ आकाशाच्या दिशेनं जाताना दिसत होते. अरूंद रस्त्यावरून वाट काढत घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यास सुरूवात केली.

तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर म्हणजेच मध्यरात्री १ वाजता आग विझवण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं. “रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास फॅशन स्ट्रीट मार्केटमध्ये आग लागल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर ५० जवान आणि १६ गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या. रात्री १ वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत फॅशन स्ट्रीट मार्केटमधील ४४८ छोटी मोठी दुकानं जळून भस्मसात झाली,” अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी माध्यमांना दिली

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago