महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि.५ जाने. २०२१ ) : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य नवनाथ पारगे यांचा चुलत भाऊ शेखर पारगे याच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील सिंहगड पायथ्याशी गावाता घडली आहे.
या प्रकरणी हवेली पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी मधील जिव्हाळा फार्महाऊसवर शेखर पारगे आपल्या मित्रांसह मद्यपान करत बसले होते. त्याच हॉटेलमध्ये डोणजे येथील काही तरुण मद्यपान व जेवणासाठी बसले होते. मध्यरात्रीनंतर शेखर पारगे आणि इतर तरुणांमध्ये शिवीगाळ सुरू झाली.
राग अनावर झाल्यावर शाकीर शेख, सज्जद शेख व इतर दोघांनी डोणजे येथे जाऊन कोयते व सत्तुर घेऊन येत शेखर पारगे याच्यावर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये शेखर पारगे याच्या डोक्याला व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. शेखर पारगे याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून हल्ला झाल्यापासून चारही हल्लेखोर फरार झाले आहेत. हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
सध्या डोणजे ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम सुरू असून यामध्ये शेखर पारगे याची डोणजे ग्रामपंचायत सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, या हल्ल्यामागे ग्रामपंचायत निवडणुकीची पार्श्वभूमी असण्याची शक्यता पोलिसांनी नाकारली आहे.
"उत्तुंग यशाची परंपरा" महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक -२७ मे२०२४) : नवी सांगवी. (समर्थ नगर) प्रतिभा…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…