पंतप्रधान मोदींच्या कार्याची जनतेत जनजागृती करणार – स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. ३० मे. २०२१) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारला आज (दि. ३० मे) रोजी सात वर्षे पूर्ण होत आहेत. मोदी सरकारने सलग सात वर्ष वेगवेगळ्या पातळीवर अभिमानास्पद कामगिरी केली आहे. या निमित्त पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता युवा मोर्चा व ‘फ’ प्रभागाचे स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव यांच्या वतीने कुदळवाडी परिसरात ‘सेवाकार्य दिन’ साजरा करण्यात आला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेली स्थिती ध्यानात घेता कोणताही उत्सव साजरा न करता परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला. त्यानुसार विविध झाडांची रोपे लावली. तसेच ती जगविण्यासाठीची देखील व्यवस्था करण्यात आली. यावेळी शाम थोरात, पंडित तिवारी, अमर लोंढे, दिपक घन आदी आदींनी परिश्रम घेतले.

याबाबत माहिती देताना दिनेश म्हणाले, भाजप हा सेवाकार्य करणारा पक्ष असून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे गेल्या सात वर्षापासून ‘सेवा परमधर्म’ या भावनेतून काम करीत आहेत.भारतीय जनता पक्षाचा व पंतप्रधान मोदी यांचा आदर्श घेऊन संपूर्ण प्रभागात ‘सेवा हीच संघटना’ हा मूलमंत्र जपत वृक्षारोपणाचे सेवाकार्य हाती घेतले.

कोरोनामुळे ऑक्सिजनचे महत्व सर्वांना पटले. वृक्षांच्या कमतरतेमुळे जागतिक हवामान बदलाचे संकट भीषण होत चालले आहे, त्यासाठी वृक्षारोपण हाच त्यावरील उतारा असल्याची प्रभागात जनजागृती करण्यात आली. पुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सात वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची माहिती जनतेला देण्याचा संकल्प केला.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

8 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

8 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago