महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ नोव्हेंबर) : 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर 2023 या कालावधीत दक्षता जागरुकता सप्ताह 2023 निमित्ताने, पुणे शहर पूर्व डाक विभागातर्फे 3 नोव्हेंबर 2023 रोजी पदमजी हॉल, MCCIA, पुणे येथे टपाल कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी “दक्षता जनजागृती सप्ताह 2023 निमित्त कार्यशाळेचे आयोजन- उप. पोलीस महानिरीक्षक, CBI पुणे आणि पोलीस अधीक्षक, ACB, पुणे यांनी केले डाक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन” केले.
या कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून श्री सुधीर हिरेमठ (IPS), उप. पोलीस महानिरीक्षक, केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (CBI) पुणे आणि मुख्य वक्ते, श्री अमोल तांबे (IPS), पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB), पुणे यांची उपस्थिती लाभली .
भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतात. भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे गरजेचे आहे. दि. 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत राज्यात दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत असून ‘भ्रष्टाचाराला नाही म्हणा; राष्ट्रासाठी वचनबद्ध व्हा’ ही संकल्पना त्यासाठी निश्चित करण्यात आली आहे.
पुणे शहर पूर्व टपाल विभागाचे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, श्री अभिजित इचके यांनी दोन्ही अधिकाऱ्यांचे स्वागत केले. प्रमुख पाहुणे श्री सुधीर हिरेमठ यांनी सीबीआयची कार्यपद्धती, यंत्रणा आणि दक्षतेची भूमिका याविषयी सादरीकरण केले. प्रमुख वक्ते, श्री अमोल तांबे (IPS) यांनी पोलीस विभागातील त्यांचा अनुभव आणि ACB द्वारे राबविल्या जाणार्या विविध उपक्रमांची माहिती दिली. दोन्ही अधिकाऱ्यांनी दक्षतेबाबत तसेच भ्रष्टाचारविरोधात एकत्रित पणे काम करण्याबद्दल श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
पुणे विभागातील 150 हून अधिक टपाल कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी या संधीचा लाभ घेत कार्यशाळेला हजेरी लावली आहे. कार्यक्रमाच्या शेवटी पुणे विभागातर्फे सर्व उपस्थितांचे आभार मानण्यात आले.