Categories: Editor Choice

अबब …! नवी सांगवी येथील पी. डब्लू. डी मैदानात ५१ फुटी रावणाच्या दहनाची जय्यत तयारी सुरू … महाभोंडला आणि दांडिया कार्यक्रमाचेही आयोजन

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ ऑक्टोबर) : चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप आयोजित व भाजप चे चिंचवड विधानसभा निवडणुक प्रमुख शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली विजयादशमी निमित्त बुधवार ०५ ऑक्टोबर रोजी नवी सांगवी येथील पी. डब्लू. डी मैदान येथे सौ.अश्विनीताई लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या उपस्थितीत सायंकाळी ०६ ते १०.०० वाजेपर्यंत महाभोंडला, दांडिया व रावणदहन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात लहान मुले रामायणातील वेशभूषा करून कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

नवी सांगवीतील पी डब्ल्यू डी मैदानात फटाक्यांनी भरलेल्या ५१ फुटी रावणावर अग्निबाणांनी या पुतळ्यांवर बाण चालवत पुतळ्याला आग लागताच धुराचे लोट जळू लागतील आणि त्यातील फटाके फुटून आणि त्यामुळे रावणाचे दहन होईल. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो, याची तयारी नवी सांगवीतील मैदानात जोरात सुरू असून समोर मोठे स्टेज तयार करण्यात आले असून, त्यासमोर महिलांच्या करीता भोंडला आणि दांडिया खेळण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. लहान मुले आणि नागरीक ही तयारी पाहण्यासाठी आत्ताच मैदानावर गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे सांगवी- पिंपळे गुरव परिसरात आणि एकंदरीत पिंपरी चिंचवड शहरात सांगवीतील रावण दहणाची चर्चा रंगू लागली आहे.

नवी सांगवी साई चौक येथील पी डब्ल्यू डी ग्राउंडवर रावणाची ५१ फुटी भव्य प्रतिकृती उभारण्याचे काम चालू आहे. त्याचे दहन व नेत्रदीपक आतिषबाजी करण्यात येणार आहे . असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमी हा दिवस साजरा केला जातो . प्रभू श्रीरामांनी याच दिवशी रावणाचा वध केला तसेच महिषासुरमर्दिनी देवी दुर्गा यांनी महिषासुर नावाच्या राक्षसाचा या दिवशी वध केला असल्याने या विजयाची साक्ष म्हणून विजयादशमी हा दिवस साजरा केला जातो .मागील दोन वर्ष कोरोना कालखंडामध्ये सर्वच सण उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले होते . यावर्षी मात्र नवी सांगवीत रावण दहनाचा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात साजरा करत विजय महोत्सव होणार आहे .

राम-रावण युद्ध- रावण राम यांची पत्नी माता सीतेचे अपहरण करून लंकेला गेला होता. भगवान राम हे युद्धाची देवी दुर्गा देवीचे भक्त होते, त्यांनी युद्धादरम्यान पहिले नऊ दिवस दुर्गा देवीची पूजा केली आणि दहाव्या दिवशी दुष्ट रावणाचा वध केला. त्यामुळे विजयादशमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. रामाच्या विजयाचे प्रतीक असलेल्या या सणाला ‘विजयादशमी‘ म्हणतात.जास्तीत जास्त नागरिक बंधू भगिनी यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी असे आवाहन भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर, माजी नगरसेवक-नगरसेविका पदाधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

9 hours ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

10 hours ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

20 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

20 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago