Google Ad
Uncategorized

आझाद मैदानात पोलीस छावणी, हजारो पोलिसांचा बंदोबस्त… मराठा आंदोलनकर्त्यांचा आझाद मैदानात ठिय्या

महाराष्ट्र 14 न्यूज, दि.28ऑगस्ट :– मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंंदोलक शुक्रवारी आझाद मैदानावर धडकणार आहेत. या आंदोलनासाठी पोलिसांनी जय्यत तयारी केली असून आझाद मैदान परिसरात दिड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे आझाद मैदानाला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. त्यातच गृहमंत्री अमित शहा देखील शुक्रवारी मुंबईत येणार असल्याने मुंबई पोलिसांची कसोटी पाहणारा ठरणार आहे.

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते जरांगे पाटील यांनी ऐन गणेशोत्सवात मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यांच्या समर्थकांसह ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषण करणार आहेत. गुरुवारी रात्री मराठा मुंबईत दाखल होणार आहेत. नवी मुंबईतून गुरूवारी रात्री अटल सेतूवर हा जत्था दाखल होईल तेथून मुक्तमार्गाने (फ्री वे) आझाद मैदानात रवाना होणार आहे. ‘न भूतो न भविष्यती’ असे हे आंदोलन होणार असल्याचा दावा करण्यात आल्याने पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी कंबर कसली आहे.

Google Ad

मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात येणार असल्याने तेथे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मनोज जरांगे पाटील हे देखील आंदोलनापूर्वी लालबाग राजाच्या दर्शनाला जाणार आहे. आंदोलन स्थळ आझाद मैदान येथे दीड हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यात २ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ६ पोलीस उपायुक्त दर्जाचे अधिकारी, २०० सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी आणि १३०० पोलीस कर्मचारी आदींचा समावेश आहे. याशिवाय राज्य राखीव दल, शीघ्र कृती दल, दंगल नियंत्रण पथक, केंद्रीय राखीव दल, बॉम्ब स्क्वॉड पथक तैनात करण्यात आले आहे.

शुक्रवारी होणाऱ्या आंदोलनासाठी मुंबईलगतच्या मिरा भाईंदर, वसई विरार आणि पालघर मधूनही हजारोंच्या संख्येने आंदोलक जाणार आहेत. त्याची जय्यात तयारी सुरू आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही आमच्या लोकांना ट्रेनने जाण्याच्या सूचना केल्या आहेत, असे आंदोलक शंकर बने यांनी सांगितले. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही मागे हटणार नाही असेही बने यांनी सांगितले. दरम्यान, गुरूवार दुपारपासून मुंबईत आंदोलनकर्ते दिसू लागले. आझाद मैदान, नरिमन पॉईंट, फोर्ट परिसरात आंदोलनकर्त्यांचे जत्थे फिरताना दिसत होते.

Ad3
ad2
ad1
Google Ad

Featured

Advertisement 1

Ad

Advertisement 2

ad

Advertisement 3

ad

Advertisement

error: Content is protected !!