पिंपरी-चिंचवडकरांनो चला कोरोनाशी लढू आणि जिंकूया … योग, व्यायाम, हास्य- मनोरंजन भाग घेण्याकरिता या लिंक ला क्लिक करा!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ मे) : पिंपरी-चिंचवडकरांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी ‘आमदार लक्ष्मण जगताप’ यांच्या माध्यमातून माजी नगरसेवक शंकर जगताप मित्र परिवार व नगरसेवक सागर आंगोळकर मित्र परिवाराच्या वतीने मोफत ऑनलाइन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत नागरिकांना योग व शारीरिक व्यायाम शिकवण्याबरोबरच हास्य मनोरंजन आणि आनंदी जीवनाचा मंत्र देण्यात येणार आहे. शुक्रवारी १४ मेपासून दररोज दिवसांतील काही तास त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत.

आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी https://rugnaseva.ruha.co.in/ या लिंकवर क्लिक करून पिंपरी-चिंचवडकरांना या ऑनलाइन कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना आपले नाव आणि राहणाऱ्या ठिकाणाची नोंदणी करावी लागेल. शुक्रवारी १४ मेपासून सकाळी ७ ते ८ या वेळेत योगसाधना, दुपारी १२ ते २ या वेळेत आनंदी जीवनाचा मंत्र, दुपारी ४ ते ५ या वेळेत पिंपरी-चिंचवड कलाकार महासंघाचा हास्य मनोरंजन आणि दुपारी ५ ते ६ या वेळेत शारीरिक व्यायाम शिकवले जाणार आहेत.

चला कोरोनाशी लढू आणि जिंकूया. योग, व्यायाम, भरपूर हास्य, सकारात्मक विचाराद्वारे आपली प्रतिकारशक्ती वाढवून एकत्र संघर्ष केला तरच हे शक्य आहे. सर्वांचे मनोबल वाढवण्यासाठी लोकप्रिय व आरोग्यदायी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना घरबसल्या मोफत ऑनलाइन मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या कार्यक्रमांचे आयोजन केल्याचे माजी ‘नगरसेवक शंकर जगताप’ यांनी सांगितले.

दररोज ऑनलाइन होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होऊन योग, व्यायाम, भरपूर हास्य, सकारात्मक विचाराद्वारे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाशी लढू आणि जिंकूया, असे आवाहन माजी नगरसेवक शंकर जगताप यांनी पिंपरी-चिंचवडकरांना केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

11 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago