पिंपरी चिंचवड हादरलं … प्रियकरासोबत वारंवार वाद, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि मारहाण, विवाहितेचं टोकाचं पाऊल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०९सप्टेंबर) : पिंपरी चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देहूरोड परिसरात विवाहित महिलेनं प्रियकराशी झालेल्या वादानंतर फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध आत्महेस प्रवृत्त केल्याप्रकरणी देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांना अटक करण्यात आली आहे.

मृतक 26 वर्षीय महिला आणि आरोपी प्रसाद गायकवाड यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. त्यामध्ये अनेकदा प्रियकर प्रसाद आणि मयत महिला याच्यांमध्ये वाद व्हायचे. त्यात आरोपी प्रसाद गायकवाड हा तिला शिवीगाळ करत मारहाण देखील करत होता. त्यामुळे महिलेने राहत्या घरात बेडरुममधील छताच्या फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येची घटना समोर आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने संबंधित ठिकाणी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी नेमकं प्रकरण काय ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी पोलिसांनी सोसायटीतील इतर रहिवाशांकडे विचारपूस केली. तेव्हा पोलिसांना घटनेमागील नेमकं कारण का ते लक्षात आलं.

पोलिसांनी या प्रकरणी आरोपी प्रसाद गायकवाड आणि रितेश भालेराव या दोघांना अटक केली. तसेच तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. यामध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दुसरीकडे मृतक महिलेला पाच-सहा वर्षांचा मुलगा देखील आहे. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने …. पुण्यातील ११ वर्षीय कुस्तीपटूचा दुर्दैवी मृत्यू

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : क्रिकेट खेळत असताना गुप्तांगावर चेंडू लागल्याने ११ वर्षीय मुलाचा…

49 mins ago

बारामतीत शरद पवारांनी लावली फिल्डींग … कोणाकडे कोणती जबाबदारी?? …. !!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीसाठी  येत्या 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यातील मतदान…

1 hour ago

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

12 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

12 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

2 days ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago