पिंपरी चिंचवड शहरातील खेळाडूंची इजिप्त देशातील आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेकरीता निवड!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१ सप्टेंबर २०२१) : पिंपरी चिंचवडच्या दिव्या वर्पे आणि कश्मिरा हुलावळे या सुवर्णकन्यांनी दैदिप्यमान कामगिरी केली असून त्या शहराचा क्रीडा विषयक नावलौकिक वृध्दींगत करतील असा विश्वास महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने इंद्रायणीनगर येथील कु. दिव्या वर्पे यांचा इजिप्त देशात होणा-या आंतरराष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेकरीता निवड झाल्याबद्दल तसेच कु. कश्मिरा सुनिल हुलावळे यांचा जिम्नॅस्टीक मध्ये मेजर ध्यानचंद राष्ट्रीय अॅवार्ड मिळाल्याबद्दल महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.

या कार्यक्रमास क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, नगरसदस्या झामाबाई बारणे, नम्रता लोंढे, स्वीकृत सदस्य दिनेश यादव, माजी नगरसदस्य योगेश लोंढे, सामाजिक कार्यकर्ता शिवराज लांडगे, सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक आणि कु. कश्मिराचे वडील सुनिल हुलावळे आणि आई राजश्री हुलावळे तसेच कु. दिव्या वर्पे यांचे पालक उपस्थित होते.

महापौर माई ढोरे म्हणाल्या इजिप्त देशात १८ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर रोजी होणा-या जागतिक किक बॉक्सिंग स्पर्धेकरीता भारतीय किक बॉक्सिंग महासंघाकडून आपल्या शहरातील     कु. दिव्या वर्पे हिची महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेली असून ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.  तसेच कु. कश्मिरा हुलावळे हिने देखील महाराष्ट्रातून एकमेव राष्ट्रीय पुरस्कार मिळविला आहे.      या दोघींचीही कामगिरी कौतुकास्पद असून यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे आई वडील, क्रीडा शिक्षक, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचेदेखील महापौर माई ढोरे यांनी कौतुक केले.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

5 hours ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

3 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

4 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

7 days ago