Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजना तयार करण्याचे कामकाज सुरु …आपले मत कळवा

 दि. १० डिसेंबर २०२२:-  महाराष्ट्र शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाच्या वतीने पिंपरी चिंचवड महापालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजना तयार करण्याचे कामकाज सुरु असून नागरिकांनी शहरातील आवश्यक सेवा सुविधा प्रस्तावित करण्यासाठी विविध माध्यमातून आपले मत विकास योजना कार्यालयास कळवावे, असे आवाहन विकास योजना, विशेष घटक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण घटकाचे नगररचना उपसंचालक विजय शेंडे यांनी केले आहे.

                शहरात नव्याने करावयाची विकास कामे, आरक्षणे, नियोजित प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाद्वारे करण्यात येते. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्यमान जमीन वापराबाबत नकाशा तयार करण्यात आला असून नकाशा महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. प्रारूप विकास योजना सुधारित करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असून अंतिम विकास योजना प्रसिध्द करण्याच्या दृष्टीकोनातून प्रारूप विकास योजनेचे  महापालिकेला लवकरच हस्तांतरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक सेवा सुविधा प्रस्तावित करण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांचे मत किंवा कल जाणून घेण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

        दरम्यान, प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने विविध शासकीय विभाग, भागधारक संस्था तसेच महापालिकेच्या विविध विभागांनी भविष्यात लागणाऱ्या सेवा सुविधांच्या जागांची मागणी नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाकडे सादर केली आहे.  विकास योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा. त्यांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब प्रारूप विकास योजनेत दिसावे. तसेच विकास आराखडा लोकाभिमुख व दोषविरहित होण्यास मदत व्हावी यासाठी नागरिकांनी त्यांचे मत कळवावे असे आवाहन शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना  करण्यात येत आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने आवश्यक सेवा सुविधांबाबत मत व सूचनाddtppcmcdp_pune@rediffmail.comया  विकास योजना कार्यालयाच्या मेल आयडीवर  अथवा  उपसंचालक, नगर रचना, विकास योजना विशेष घटक, पिंपरी चिंचवड महापालिका व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालय, पिंपरी-पुणे,४११०१८ तसेच  संत तुकारामनगर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मार्केट इमारत, तिसरा मजला, पिंपरी, ४११०१८ या पत्त्यावर पाठवावे.  असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

5 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

6 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago