पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘सायकल चालवा , प्रदूषण टाळा’ … या योजनेला १७ विघ्न, सायकली झाल्या गायब!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगर पालिकेकडून विविध योजना राबविण्यात येतात. महानगरपालिकेने शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे याकरिता नागरिकांसाठी, ‘सायकल चालवा, प्रदुषण टाळा’ ही योजना आखली होती. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गंत पायलट प्रोजेक्ट म्हणून पिंपरी-चिंचवड शहरात ‘बायसिकल शेअरिंग’ प्रकल्प राबविण्यात आला.

खासगी कंपन्यांच्या माध्यमातून पिंपळेगुरव व पिंपळेसौदागार भागात वेगवेगळ्या चार सायकल कंपन्यामार्फत ४५ ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात आला. या योजनेकरिता नाममात्र दरात सायकली उपलब्ध करुन देण्याची यूलू, पेडल, मोबीसाईल आणि मोबिक या चार सायकल कंपन्यांनी तयारी दर्शविली आणि त्या चालू झाल्या. याकरिता प्रति तास नाममात्र शुल्क आकारले जात होते व हे भाडे ऑनलाईन पद्धतीने भरावे लागत होते.

नागरिकांनी कमी अंतराच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव परिसरातीत वेगवेगळ्या चार सायकल कंपन्यामार्फत तब्बल ४५ ठिकाणी ‘पब्लिक बायसिकल शेअरींग’ उपक्रम सुरू करण्यात आला. यासाठी महापालिकेने एका कंपनीला सायकल उपलब्ध करण्यासाठी निविदा काढून काम देण्यात आले. त्या कंपनीकडून सायकली उपलब्धही झाल्या, अँप डाऊनलोड करून ठराविक वेळेकरिता काही रक्कम ऑनलाईन भरून नागरिकांनी त्याचा वापरही सुरू केला, आणि खरचं स्मार्ट सिटीकडे आपले शहर झेप घेत असल्याची ती सुरवात होती.

पिंपरी चिंचवड शहरात नागरिकांसाठी, सायकल चालवा, प्रदुषण टाळा ही योजना आखली होती. यामुळे शहराचे प्रदूषण कमी होणार होते. रस्त्यांवरील पार्किंगचे प्रश्न कमी होणार होते. सायकल चालविल्यामुळे शारीरिक व्यायाम व आरोग्य सुधारणार होते, याकरिता महापालिकेकडून लाखो रुपये खर्च करून शहरात जाहिरातींचे फ्लेक्स फ्रेम करून ठिकठिकाणी लावण्यात आले. त्याच ठिकाणी सायकलीचे नियोजन केले. अनेक नागरिक या सायकलीचा वापर करू लागले.

परंतु म्हणतात ना ‘नकटीच्या लग्नाला १७ विघ्न’ काही दिवसातच महापालिकेची ही योजना बंद पडली. सायकली गायब झाल्या. पण लावलेले जाहिरातीचे फ्लेक्स ( बोर्ड ) तसेच आहेत. शहरात स्मार्ट सिटीचे वारे वाहू लागले. टप्याटप्यावर स्मार्ट सिटीची कामे जोरात सुरू झाली. जिकडे तिकडे चोहीकडे रस्ते खोदाई सुरू झाली. पिंपळे गुरव परिसरातील मयुर नगरी, निळू फुले नाट्यगृह, काशी विश्वेश्वर शाळा, तुळजा भवानी मंदिर येथे रस्त्याच्या कडेला असणाऱ्या महापालिकेच्या सायकल चालवा, प्रदुषण टाळा या योजनेचे जाहिरातींचे फलक धूळ खात पडलेले दिसून येत आहेत. महापालिकेच्या स्थापत्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे डोळे झाक न करता येथील या योजनेचे फलक काढण्यात यावेत, नाहीतर सायकल ची व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago