मिळकत करात कोणतीही वाढ नसणार आहे. अनधिकृत नळजोड टाळण्यासाठी सुरक्षा ठेवीची अट काढली आहे. सर्वाना नळ कनेक्शन मिळणार आहेत. चिखली पाणीपुरवठा वीस दिवसात मार्गी लागेल. म्युनिसिपल बॉन्डचा वापर करून मुळा, इंद्रायणी, पवना नदी पुनुर्जीवन प्रकल्पासाठी निधीची उभारणी केली जाणार आहे, असे आयुक्तांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात र.रु. ४९६१.६५ कोटी (शिल्लकेसह) इतकी रक्कम जमा होईल हे अपेक्षित धरुन सन २०२२- २३ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक स्थायी समिती मार्फत महापालिका सभेपुढे सादर केले होते. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात र.रु. ५२९८.३१ कोटी (आरंभिच्या शिल्लकेसह ) उत्पन्न अपेक्षित आहे व त्यात प्रत्यक्षात खर्च र.रु. ५२९२ कोटी होईल व मार्च २०२४ अखेर र.रु. ६.३० कोटी इतकी शिल्लक राहील.
महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी जितेंद्र कोळंबे यांच्या उपस्थितीत आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त – १ प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, जितेंद्र वाघ, रविकिरण घोडके यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. महापालिकेचा हा ४० वा अर्थसंकल्प आहे. तर, आयुक्त सिंह यांचा हा पहिला अर्थसंकल्प आहे.
गतवर्षी महापालिकेचे एकूण ४९६१ कोटी ६५ लाख व केंद्र शासन व राज्य शासनाच्या पुरस्कृत योजनेसह ६ हजार ४९७ कोटी २ लाख रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. त्यावर कोरोनाचे सावट होते.
अंदाजपत्रकाची खास वैशिष्टये :-
- स्थापत्य विशेष योजना या लेखाशिर्षांतर्गत र.रु. ८४६ कोटी तरतूद प्रस्तावित आहे.
- शहरी गरीबांसाठी (BSUP) अंदाजपत्रक तरतूद र.रु. १५८४ कोटी.
- जेंडर बजेट- महिलांच्या विविध योजनांसाठी भरीव तरतूद र.रु. ४८.५४ कोटी.
- दिव्यांग कल्याणकारी योजना तरतूद र रु ४५ कोटी.
- पाणीपुरवठा विशेषनिधी र रु. १५४ कोटी.
- पी.एम.पी.एम.एल. करिता अंदाजपत्रकामध्ये र.रु. २९४ कोटीची तरतूद.
- भूसंपादना करिता र. रु. १२० कोटी तरतूद.
- अतिक्रमण निर्मूलन व्यवस्थेकरिता र.रु. १० कोटी तरतूद.
- स्मार्ट सिटीसाठी र. रु. ५० कोटी तरतूद.
- अमृत २.० योजनेसाठी र.रु. २० कोटी तरतूद.
सार्वजनिक व खाजगी भागीदारी/इतर वित्तीय स्त्रोतांमार्फत करावयाची कामे :-
- कर्जरोख्या द्वारे (Municipal Bond) मुळा, पवना व इंद्रायणी नद्यांचे पुनरुज्जीवन
- अण्णासाहेब मगर स्टेडिअम
- EV Charging Station
- सिटी सेंटर
- बी.आर.टी.एस. रस्त्यांचे सुशोभिकरण
- मनपाती सर्व उद्यांनाचा विकास
- ७५ एम एल डी टर्सरी ट्रिटमेंट प्लांट
- मोशी रुग्णालय
समाजविकास विभाग :-
- ‘उड्डान’ या योजने अंतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या, उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांना अर्थसहाय्य तसेंच नोकरी करणाऱ्या महिलांना वसतिगृह सुविधा.
- याच योजने अंतर्गत आरोग्य सुधारणा, कौशल्य वाढ प्रशिक्षण व समुपदेशनासाठी सोई सुविधा.
- ‘उमेद जागर’ या योजने अंतर्गत करोना मधील विधवा महिलांच्या बचत गटास प्रशिक्षण, व्यवसायासाठी साधन सामुग्री व उत्पादन विक्री साठी बाजारपेठ उपलब्ध करुन देणे.
- महाराष्ट्र शासनाच्या “लेक लाडकी” या योजने अंतर्गत देण्यात येणाऱ्या रक्कमे प्रमाणे तेवढीच पूरक रक्कम देणेत येणार.
- शहरातील दिव्यांग नागरिकांचे सर्वेक्षण करुन ० ते ६ वयोगटातील मुलांचे लवकर निदान व लवकर उपचार या योजने अंतर्गत तपासणी करुन उपचार.
- शहरातील विशेष मुलांसाठी निरामय आरोग्य विमा योजनेची हप्ता रक्कम अदा केली जाणार.
- शहरातील दिव्यांग नागरिकांसाठी सर्व सुविधा युक्त दिव्यांग भवन व सक्षमिकरणासाठी प्रगत प्रशिक्षण.
- शहरातील मागास वर्गीय युवक युवतींना उच्च शिक्षणासाठी तसेच स्पर्धा परिक्षेसाठी पुस्तके व आर्थिक सहाय्य
- शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनां शिष्यवृत्ती व सायकल वाटप. जेष्ठ नागरीकांसीठी विरंगुळा केंद्र व उपयोगी साहित्य वाटप. .
- ५० वर्षांपुढील तृतीय पंथीयांसाठी पेन्शन व रोजगार उपलब्ध करणे.
क्रिडा विभाग :-
- वाकड येथे अत्याधुनिक ८ कोर्ट चे बॅडमिंटन स्टेडियम.
- अश्वरोहकांना प्रशिक्षण देण्यासाठी अकादमीची स्थापना.
- रायफल आणि पिस्तुल शुटींग व धनुर्विद्या अकादमीची स्थापना.
- अण्णासाहेब मगर स्टेडिअमचे बहुउद्देशीय सुविधेत रुपांतर.
शिक्षण विभाग :-
- विद्यार्थी व शिक्षकांचे मुल्यांकन करुन त्यांच्यामध्ये शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेसाठी Quality Control of India यांचे सोबत करारनामा.
- सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन शाररिक दोष असणाऱ्या विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार.
- विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी ग्रंथालयांची स्थापना.
- इयत्ता ५ वी व ७ वी शिष्यवृत्ती परिक्षेत गुणवत्ता यादी मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भारत दर्शन अभ्यास दौऱ्याचे आयोजन.
- विद्यार्थ्यांचे शालेय, मानसिक आरोग्य संवर्धनासाठी समुपदेशक तसेच कला व क्रिडा शिक्षकांची नेमणुक
- जल्लोप शिक्षणाचा उपक्रमांतर्गत मनपाच्या शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक, गुणात्मक, नाविन्यपूर्ण विचारवाढीकरीता विद्यार्थी व शाळा स्तरावर स्पर्धेचे नियोजन
पाणीपुरवठा विभाग
- अनधिकृत नळ जोड अधिकृत करुन NRW कमी करणे.
- अधिकृत नळ जोडांची MDPE पाईप वापरुन पाणी गळती थांबवणे. • भामा आसखेड व आंद्रा प्रकल्पांची उर्वरीत कामे पूर्ण करणे.
- शहरातील पाणीपुरवठा सुरळीत राहणेसाठी दुर्गादेवी येथे नवीन प्रकल्प राबविणे.
- पुणे मुंबई महामार्गालगत १००० ते ६०० मि.मी. व्यासाची ग्रॅव्हिटी मेन टाकणे.
अग्निशमन विभाग
- मध्यवर्ती अग्निशमन व आणीबाणी नियंत्रण कक्ष तथा मुख्यालय व अग्निशमन प्रशिक्षण केंद्राची स्थापना.
- च-होली, दिघी, पुनावळे व एमआयडीसी भोसरी येथे ४ नवीन उप अग्निशमन केंद्राची उभारणी. • नविन अग्निशमन वाहने, अत्याधुनिक अग्निशमन व विमोचन साहित्याची खरेदी करणे.
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन अग्निशमन यंत्रणा उभारणे. (IT Enabled Fire Response System)
- धोकादायक ठिकाणचे असुरक्षा मुल्यांकन.
पर्यावरण विभाग :-
- मुळा, पवना व इंद्रायणी या नद्यांच्या पुनरुज्जीवनाचे नियोजन.
- कच-या पासुन बायोगॅस व ऊर्जा निर्मिती या प्रकल्पांचे नियोजन.
- बांधकाम व कचरा राडारोडा प्रक्रिया संयंत्राचे कार्यान्वयन.
- मोशी येथे बायोमायनिंग प्लांट सुरु करण्याचे नियोजन. .
- अमृत १० व अमृत २.० अंतर्गत पिंपळे निलख, बोपखेल, चिखली व भोसरी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
- राष्ट्रीय शुद्ध हवा प्रकल्पांतर्गत हवा प्रदुषण कमी करण्यासाठी Mist Type Water Fountain उभारणी
- पी. एम. पी. एम. एल. साठी ई-बसेस, घरगुती घातक कचरा (Domestic Hazardous व Sanitary West) चे दोन प्रकल्प.
- १५ व्या वित्तआयोगातंर्गत विविध जल स्त्रोतांचे पुनरुज्जीवन.
- पर्यावरण संवर्धन व हवा गुणवत्ता, वाहतुक व दळणवळण, पर्यायी ऊर्जा, सामाजिक विकास,आपत्ती जोखीम, वित्त आणि नव-नविन
- कल्पना अशा गरजांवर काम करण्यासाठी Sustainability Cell ची स्थापना.
- सार्वजनिक व खाजगी भागीदारी तत्वावर शहरात २२ ठिकाणी EV Charging Station.
- महानगरपालिकेच्या इमारतींवर तसेच वेगवेगळ्या STP / WTP वर सोलर एनर्जीचा वापर
आरोग्य विभाग
- यांत्रिकी मशिन द्वारे रस्त्यांची साफसफाई.
- शून्य कचरा झोपडपट्टी संकल्पना.
- नवी दिशा योजने द्वारे स्वच्छता गृहांचे नूतनीकरण.
- घनकचरा व्यवस्थापनासाठी आठ ठिकाणी वेस्ट ट्रान्सफर केंद्राची स्थापना.
उद्यान विभाग :-
- दुर्गादेवी टेकडी उद्यान येथे बॉटनिकल गार्डनची उभारणी.
- तळवडे गायरान येथे जैव विविधता उद्यान (Bio Diversity Park) ची स्थापना.
- दिघी गायरान येथे मियावाकी प्रकल्पाची उभारणी.
वैद्यकीय विभाग :-
- मोशी येथे ७५० खाटांचे नविन रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय.
- मासुळकर कॉलनी येथे नेत्र रुग्णालय.
- तालेरा रुग्णालय येथे मल्टी स्पेशालिटी सेवा.
- जुने तालेरा रुग्णालय येथे वृद्धांकरीता सेवा.
- पी.पी.पी. तत्वावर कॅन्सर हॉस्पिटल.
- Social Impact Bond च्या माध्यमातुन सर्व रुग्णालये व दवाखान्यांचे NABH प्रमाणीकरणं.
- मनपाचे सर्व रुग्णालयामध्ये दंत चिकित्सा सेवा.
- थेरगाव रुग्णालय येथे ट्रामा सेंटर तसेच नाक, कान व घसा शस्त्रक्रिया विभाग.
पायाभूत प्रकल्प :-
- नविन मोशी रुग्णालय.
- नविन मध्यवर्ती ग्रंथालय.
- मोरवाडी येथे दिव्यांग पुनर्वसन केंद्र स्थापना.
- पुणे सातारा व नाशिक हायवे सेवा रस्त्याचे कामकाज पुर्ण करणे..
- चिखली येथे टाऊन हॉल विकसित करणे.
- पिंपरी उड्डान पुलाची दुरुस्ती व पुनर्वसन.
- जुना पुणे मुंबई व टेल्को रस्त्याचे Street Scaping.
- धर्मराज चौक ते ईस्कॉन मंदिर व बिर्ला हॉस्पिटल ते डांगे चौक या रस्त्याचे सुशोभिकरण.
- वाल्हेकरवाडी ते औंध रावेत रस्त्याचे कामकाज पुर्ण करणे.