पिंपरी चिंचवड महापालिका शहर परिसरातील अनधिकृत होर्डींग्ज हटणार … स्वतंत्र एजन्सीकडे देण्यात येणार काम, पालिकेलाही मिळणार पैसे!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ मार्च २०२१) : होर्डिंग्ज लावल्यावर महानगरपालिकेला उत्पन्न मिळते हे सर्वांना माहीत आहे, परंतु आता होर्डिंग्ज काढल्यावर ही पालिकेच्या तिजोरीत भर पडणार आहे.  पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील अनधिकृत होर्डिंग्ज जाहिरात फलकांचे सर्वेक्षण करणार असून हे फलक स्ट्रक्चरसह या हटविण्यात येणार आहे.  यासाठी पालिका स्वतंत्र एजन्सीकडे हे काम देणार आहे.  या एजन्सी स्वखर्चाने स्ट्रक्चर काढणार असून काढण्यात आलेल्या अनधिकृत होर्डींग्ज स्ट्रक्चरच्या ८० टक्के भागाच्या विक्रीची रक्कम महापालिकेला मिळणार आहे.   या विषयास स्थायी आज समितीने मंजूरी दिली.

याविषयासह महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह अवलोकनाचे विषय आणि विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या एकूण सुमारे ३५ कोटी ५१ लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची विशेष सभा पार पडली.  सभेच्या अध्यक्षस्थानी अॅड. नितीन लांडगे होते. केएसबी चौक ते देहु आळंदी रस्त्यापर्यंतच्या रस्त्याचे पॅचवर्क पध्दतीने डांबरीकरण करणे आणि स्थापत्य विषयक दुरुस्तीची कामे करण्यासाठी १ कोटी ४० लाख रुपये खर्च होणार आहेत.

प्रभाग क्र.१८ मधील गांधी पेठ, चिंचवड व इतर परिसरातील जलनिःसारण विषयक सुधारणा कामे करणे आणि उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्याकामी २५ लाख  रुपये  खर्च होणार आहेत. नाशिक फाटा ते वाकड या ४५ मीटर बीआरटीएस रस्त्याचे डांबरीकरण  करण्याकामी १ कोटी ४० लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. या खर्चासही स्थायी समितीने मान्यता दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

1 week ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

1 week ago