पिंपरी चिंचवड महानगरपालिका देणार … दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयातील उपस्थितीत सुट!

महाराष्ट्र 14 न्यूज,(दि. १७ मे २०२१) : कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत महानगरपालिका आस्थापनेवरील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचा-यांना लॉकडाऊन कालावधीत कार्यालयातील उपस्थितीमध्ये सुट देण्याचा आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी निर्गमित केला आहे.

महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेवून शासकीय कार्यालयातील दिव्यांग अधिकारी आणि कर्मचारी यांना कार्यालयातील उपस्थितीत सुट देण्याबाबतच्या सूचना शासनातर्फे पारित करण्यात आलेल्या आहेत.

दिव्यांग व्यक्तींची रोग प्रतिकारक शक्ती सर्वसामान्यांच्या तुलनेत तितकीशी चांगली नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करणे कष्टप्रद आणि त्रासदायक होत आहे.  सर्व दिव्यांग   कर्मचा-यांना कार्यालयात उपस्थित राहण्यापासून सूट देण्यास व त्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  या सूचनांचे कार्यालयांमध्ये काटेकोरपणे पालन होईल याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी, असे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी दिले आहेत.


या सवलतीमुळे विभागांतील दैनंदीन कामकाजात अडचण येणार नाही याची दक्षता सर्व संबंधित विभाप्रमुखांनी घ्यावी, वर्क फ्रॉम होमची सवलत दिलेल्या दिव्यांग कर्मचा-यांनी आभासी माध्यम (व्ही.सी.), ईमेल, व्हॉटसअप, गुगल मीट, घरगुती संगणक इत्यादी आधुनिक माध्यमांचा वापर करुन कार्यालयीन कामकाजाकरीता संपर्कात राहून कामकाज करावे, असे आदेशात नमूद केले आहे.  या सूचना पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार आहेत असे विकास ढाकणे यांनी कळविले आहे.

 

Maharashtra14 News

Recent Posts

सावधान : सांगवीत गॅस चोरी करून काळ्या बाजारात चढ्या दराने होतेय विक्री … चोरी करणारा तरुण ताब्यात

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी भागात गॅस चोरी करून काळ्या…

6 hours ago

देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरमध्ये कार्यकर्त्यांकडून एक खास भेट … तर, फडणवीसांनी दिला कार्यकर्त्याला सल्ला

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ मे) : लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक शेवटपर्यंत…

6 hours ago

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

4 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago