पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समितीची सुसाट एक्सप्रेस … तब्बल ४३७ कोटी रुपये च्या खर्चास मान्यता!

महाराष्ट्र 14 न्यूज,, ( २६ फेब्रुवारी २०२१ ) : महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणा-या विविध विकास कामांच्या खर्चासह तरतूद वर्गीकरण, अवलोकनाच्या विषयासह विविध विकास विषयक बाबींसाठी झालेल्या आणि येणा-या विषयपत्रिकेवरील विषयांच्या एकूण सुमारे ४३७ कोटी रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

महापालिका मुख्य प्रशासकीय भवनात आज स्थायी समितीची बैठक पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते.
प्रभाग क्र.११ मधील स्वामी विवेकानंद हॉल ते थरमॅक्स चौकाकडे जाणा-या रस्त्याचे तसेच कृष्णानगर मुख्य रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी २२ कोटी खर्च केले जातील.

नेहरुनगर परिक्षेत्रातील पाण्याच्या टाक्यांचे परिचालन आणि किरकोळ दुरूस्तीची कामे करण्यासाठी १ कोटी ७५ लाख खर्च होणार आहे.

प्रभाग क्र.२४ मधील आरक्षण क्र.६२८ खेळाच्या मैदानात सिंथेटीक ट्रॅक बांधण्यासाठी ७२ लाख रुपये खर्च केले जातील.

सेक्टर क्र.२९ मधील भाजी मंडई परिसर विकसित करण्यासाठी ४२ लाख रूपये खर्च होणार आहे.
आकुर्डी गावठाण, गंगानगर आणि इतर परिसर, पिंपळे सौदागर व रहाटणी येथील जलनि:सारण विषयक सुधारणा कामे आणि नलिका टाकण्यासाठी १ कोटी १० लाख रुपये खर्च होतील.

चिखली, कासारवाडी, चिंचवड, पिंपळे निलख, किवळे मैला शुद्धीकरण केद्रांतर्गत येणा-या मैला पंप हाऊसेसचे चालन देखभाल दुरुस्तीसाठी ९ कोटी ५३ लाख रुपये खर्च येणार आहे.

भोसरी येथील सर्व्हे नं.१ शेजारिल नाल्याची सुधारणा आणि स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी १७ कोटी रुपये खर्च येणार आहे.

चिखली येथील सेक्टर क्र.१७ आणि क्र.१९ येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या गृह प्रकल्पामध्ये स्थापत्य विषयक कामे करण्यासाठी ६२ लाख खर्च होतील.

काळेवाडी फाटा ते एमएम शाळेपर्यंतच्या तसेच सांगवी किवळे बीआरटीएस रस्त्यावर पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करण्याच्या कामासाठी ३१ कोटी १८ लाख इतका खर्च होणार आहे.

भक्ती शक्ती चौक ते मुकाई चौक या रस्त्यावर बस स्थानक बांधण्यासाठी ७ कोटी ६७ लाख रूपये खर्च होतील या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

37 mins ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

1 day ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

2 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

3 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

3 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

6 days ago