Categories: Editor Choice

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा कार्यभार ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ४ नोव्हेंबर  २०२२) :  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचा कार्यभार ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांच्या मान्यतेने सामान्य प्रशासन विभागामार्फत स्वतंत्र आदेश निर्गमित करण्यात आला आहे. 

        पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील मुख्य अग्निशमन अधिकारी या पदावर कार्यरत असलेले किरण बाळमुकुंद गावडे हे नियत वयोमानानुसार दि.३१ ऑक्टोबर    रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे पद रिक्त झाले. हा विभाग महत्वाचा असल्याने   प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने अग्निशमन विभागाचा अतिरिक्त कार्यभार ह क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या आदेशाची अंमलबजावणी आज ४ नोव्हेंबर पासून सुरु झाली असून पुढील आदेश होई पर्यंत थोरात या विभागाचे कामकाज पाहणार आहेत.

Maharashtra14 News

Recent Posts

रोहित पवारांचा अजित पवारांवर निशाणा … अजित दादा तुमच्यात जर धाडस असेल तर ….

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०४ मे) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या…

1 day ago

तुमच्या इथे कोणाविरुद्ध कोण? जाणून घ्या, … पहा, महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघातील उमेदवारांची यादी!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…

3 days ago

अंध दिव्यांग नागरिकांना ब्रेल लिपीतील व्होटर स्लिपचे वाटप

महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…

4 days ago

दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप व आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…

5 days ago

‘जर तुम्ही माझ्या बाबतीत काही चूक केली, तर पुन्हा माझ्याकडे पायरी चढायची नाही … नेत्याने दिला कार्यकर्त्याना दम

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…

1 week ago