पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून कोरोनाच्या काळातील सर्वात मोठी कारवाई … अनधिकृत पत्रा शेडवर झाली कारवाई!

महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील ‘क’ क्षेत्रिय कार्यालय मधील मौजे चिखली ( प्रभाग क्र २ ) जाधववाडी , कुदळवाडी भागातील १८ मी देवराई डी .पी रोडलगत लगतच्या अनधिकृत पत्राशेड व बांधकामावर आज दि ०३ फेब्रुवारी २०२१ रोजी महापालिकेची बांधकाम परवानगी व अनाधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली.

सदर कारवाई मध्ये कुदळवाडी मधील गट नः२५६ ,२५७, २५८, २५९ येथील सोबत जोडलेल्या यादीनुसार एकूण ६८ अनधिकृत पत्राशेड असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे १,४६ ,००० चौ .फूट पाडण्यात आली आहेत. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त २ अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली , उपायुक्त श्री मनोज लोणकर , सह शहर अभियंता मकरंद निकम यांचे उपस्थितीत तसेच मा कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांचे नियत्रंणाखाली उपअभियंता सूर्यकांत मोहिते , हेमंत देसाई , सुधीर मोरे तसेच ५ कनिष्ठ अभियंता व एकूण ४८ बीट ऑफीसर तसेच सदर कारवाईसाठी पोलीस विभागामार्फत डी सी पी सुधीर हिरेमठ व आनंद भोईटे. सहायक आयुक्त संजय नाईक पाटील , पी आय सतिष माने , दिलीप भोसले , शहाजी पवार , १० पी एस आय व १o५ पोलीस कर्मचारी व ३० एस आर पी यांचे उपस्थितीत कारवाई करण्यात आली.

सदर कारवाई साठी २ पोकलेन , ७ जेसीबी , २ क्रेन व महापालिकेचा अतिक्रमण विभागाचा कर्मचारीवर्ग मोठया ताफयासह उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात यापुढेही ठिकठिकाणी झालेल्या व्यापारी अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात येणार असुन सदर पत्राशेड धारकांना पत्राशेड काढून घेण्याचे व होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago