पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी -२ यांच्या संयुक्त विद्यमाने … रविवार दि . २० डिसेंबर रोजी सायकल फेरी ( सायक्लोथॉन )

महाराष्ट्र 14 न्यूज, ( दि . १८ डिसेंबर ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ डी -२ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि . २० डिसेंबर रोजी सायकल फेरी ( सायक्लोथॉन ) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . सायकल फेरी ( सायक्लोथॉन ) सांगवी फाटा ते साई चौक ( जगताप डेअरी ) ते सांगवी फाटा या बीआरटीएस मार्गावर आयोजित करण्यात आली आहे . महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून या फेरीचा प्रारंभ होणार आहे .

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्हा पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणा – या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे , सुप्रिया सुळे , डॉ . अमोल कोल्हे , आमदार लक्ष्मण जगताप , महेश लांडगे , आण्णा बनसोडे , संग्राम थोपटे , उपमहापौर केशव घोळवे , स्थायी समिती सभापती संतोष लोंढे , सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके , विरोधी पक्षनेता राजू मिसाळ , आयुक्त श्रावण हर्डीकर , पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश , ३३० इन्फंट्री ब्रिगेडचे कमांडर ब्रिगेडीअर आर . सी . कटोच , लायन्स क्लबचे प्रांतपाल लायन अभय शास्त्री यांच्यासह पदाधिकारी , नगरसदस्य , अधिकारी , कर्मचारी , नागरिक उपस्थित राहणार आहेत .

स्वच्छ भारत – स्वस्थ भारत या अभियानाअंतर्गत इंडिया सायकल फॉर चेंज चॅलेंज या केंद्र सरकारच्या कार्यक्रमांतर्गत समाजामध्ये हवा – ध्वनी प्रदुषण टाळून , इंधन बचती बरोबरच उत्तम आरोग्य राखण्यासाठी सायकल चालविण्याची गरज तसेच महत्व पटवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . समाजात विशेषतः आजच्या तरूण पिढीमध्ये कोवीड साथीच्या काळात व्यायामाचे महत्व त्याच बरोबर इंधन बचतीचा संदेश रूजवण्यासाठी हा कार्यक्रम महत्वपूर्ण ठरणार आहे . या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आयर्नमॅन कृष्ण प्रकाश यांचा आंतरराष्ट्रीय ट्रायथलॉन स्पर्धा पुर्ण केल्याबाबत सत्कार करण्यात येणार आहे . तसेच वेणुगोपाल राव , जय पाठक , श्रीपाद शिरोडे आणि अरूण पोटे यांचाही सत्कार करण्यात येईल .

हा कार्यक्रम यशस्वी करण्यामाठी महापालिका आयुक्त , बीआरटीएस विभाग , इतर विभागाचे सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधी तसेच लायन्स क्लब प्रयत्नशील आहे . या कार्यक्रमामध्ये पिंपरी चिंचवड व पुणे परिमरातील सायकल क्लब देखील सहभागी होणार आहेत . या कार्यक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवून उर्जा बचत आणि हवा – ध्वनी प्रदुषण टाळून , इंधन बचतीचा संदेश समाजात रूजवावा असे आवाहन महापौर ढोरे यांनी शहरवासीयांना केले आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

3 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

6 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago