पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांची आण्णासाहेब मगर स्टेडियम जम्बो कोविड रुग्णालयास भेट … कामकाजाचा घेतला आढावा !

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २० एप्रिल ) : पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांनी कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या आण्णासाहेब मगर स्टेडियम जम्बो कोविड रुग्णालयास भेट दिली.आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे हे वारंवार मनपाच्या जम्बो कोविड , अँटोक्लस्टर , गवळी माथा , वाय.सी.एम.एच. व इतर रुग्णालयांना वारंवार भेटी घेवून त्याचा आढावा , आवश्यक त्या सूचना , नियोजन हे करत असतात .

त्यानुसारच सद्यस्थितीमध्ये जम्बो कोविड रुग्णालयाच्या बाबतीत बऱ्याचश्या तक्रारी बातम्या येत असल्याने मा.आयुक्त यांनी मनपाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह , अतिरिक्त वैद्यकिय अधिकारी पवन साळवे , वाय.सी.एम. चे पाठक , जम्बो कोविड रुग्णालयाचे समन्वयक खांडेकर , जोशी , सुनिल वाघमारे तसेच जम्बो कोविडचे मुख्य संग्राम कपाले यांच्या समवेत जम्बो कोविडच्या ICU , O2 व इतर वॉर्ड च्या रुग्णांशी संपर्क साधला , प्रत्यक्ष संवाद साधला , रुग्णांना औषध उपचार , जेवण , त्याचा दर्जा , डॉक्टरांशी संवाद व टॉयलेटची साफसफाई यासंबंधी प्रत्येकाशी विचारपूस केली .

त्यानंतर टॉयलेटस् , स्वच्छतागृह याची प्रत्यक्ष पाहणी केली . त्यानंतर बाहेर रुग्णांचे नातेवाईक यांचेशी सुध्दा प्रत्यक्ष संवाद साधला व त्यांना विश्वास दिला की , आतील रुग्णांची मनपामार्फत चांगल्या प्रकारची सोय , औषध उपचार करण्यात येत आहे . सदर जम्बो कोविड मध्ये मा.आयुक्त यांनी सुमारे १ तास सगळ्या गोष्टींची प्रत्यक्ष पाहणी व माहिती घेतली व संबंधितांना आवश्यक त्या सूचना सक्त ताकीदी दिल्या .

ऑक्सिजन पुरवठा सद्यस्थितीमध्ये सर्वांना ज्ञात आहे . ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी खुप अडचणी निर्माण होत आहे . तरी सुध्दा मनपामार्फत आवश्यक असणारा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे . त्यासाठी समन्वयक म्हणून उपायुक्त श्रीम.स्मिता झगडे ( मो.नं .7887893077 ) हे काम पहात आहेत . तसेच मा.जिल्हाधिकारी स्तरावरुन एक समिती स्थापन करण्यात आलेली असून त्यांच्यामार्फत ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी नियोजन करुन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे .

Maharashtra14 News

Recent Posts

पुणे व पिंपरी-चिंचवड शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी … झोपडपट्टी पुनर्वसनासाठी ५० नवीन प्रस्ताव दाखल

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सुधारीत नियमावलीतील तरतुदींमुळे झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला…

4 days ago

मतमोजणी केंद्राच्या १०० मीटर परिसरात मनाई आदेश लागू, तर जिल्ह्या याठिकाणी होणार मतमोजणी

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२३ मे) : जिल्ह्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय…

4 days ago

आता नागरिकांच्या तक्रारींचा जागेवरच होणार निपटारा … पोलिस आयुक्तांचे आदेश

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : नागरिकांशी थेट संवाद साधता यावा, तक्रारदारांची गैरसोय होऊ नये…

6 days ago

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ५ अनधिकृत जाहिरात फलकांवर निष्कासनाची कारवाई

महाराष्ट्र 24 न्यूज, दि. २० मे २०२४ - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत जाहिरात…

7 days ago

उद्या दुपारी एक वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार, विध्यार्थ्यांना आणि पालकांना निकालाची उत्सुकता

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० मे) : महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीनं (MSBSHSE) बारावीच्या परीक्षेच्या निकालाची…

7 days ago

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 weeks ago