पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्ये संदर्भात खाजगी रुग्णालयांना दिले हे आदेश …

महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ३० मार्च  :  शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता बेडची उपलब्धता कमी पडत असून खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. परंतु खाजगी रुग्णालयातील बेडची माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची तारांबळ होत असल्याचे निदर्शनास येत असून खाजगी रुग्णालयांनी वेळीच डॅशबोर्ड अपडेट करावेत, अशा सुचना महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्या. यासंदर्भात, दररोज बेडची माहिती महापालिका वॉररुमकडे सादर न करणा­-या खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले.

शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त यांच्या दालनात महापौर ऊषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, उपमहापौर ‍हिराबाई उर्फ नानी घुले, नगरसेवक संतोष कांबळे, सतिश कांबळे, आयुक्त राजेश पाटील सर, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डॉ. पवन साळवे, डॉ. वर्षा डांगे, डॉ. राजेश वाबळे आदी उपस्थित होते.

सदर बैठकीत आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचे प्रतिनिधी डॉ. सतिष कांबळे यांनी कोरोना रुग्णांना भेडसावणा­-या समस्या, मनपा हॉस्पिटल, शासकीय रुग्णालय, खाजगी हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ उपाययोजना व भविष्यात लागणारे बेड, ऑक्सिजन, व्हेटिलेटर आदींची त्वरित उपलब्धता व्हावी, जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे, कोवीड ॲब्युलन्स, लागणारे डॉक्टर इत्यादि विषयावर चर्चा करून महापौर माई ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला कोरोना परिस्थितीवर मात कशी करता येईल, यावर उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या.

Maharashtra14 News

Recent Posts

मोशीत वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे “या” ठिकाणी ; भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.1६ मे ) : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी, डुडळगाव, चऱ्होली परिसरात सोसाट्याच्या…

2 days ago

चिंचवड ठरविणार मावळच्या विजयाची गणिते, … ४ जूनला कोणती शिवसेनेचा गाठणार दिल्ली? ?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ मे) : लोकसभेचे मतदान पार पडल्यानंतर आता मावळ विधानसभा मतदारसंघात मताधिक्य…

4 days ago

नवी सांगवीत या शाळेत झाले बोगस मतदान … तर, मोबाईल बंदी मुळे अनेक मतदार गेले माघारी … पोलिस आणि मतदारांमध्ये हुज्जत

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१३ मे) : मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (दि. १३) मतदान झाले. सकाळी…

5 days ago

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी मानले मावळ आणि शिरूर च्या मतदारांचे आभार, असे झाली मतदानाची टक्केवारी:

महाराष्ट्र 24 न्यूज, (दि.१३ मे) : आज (दि.१३ मे) पुणे जिल्ह्यातील मावळ, शिरूर आणि पुणे…

5 days ago

नवी सांगवीत मतदानाला शांततेत सुरवात; बा रा घोलप महाविद्यालयात सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा, कंट्रोल रुमद्वारे प्रशासनाचे लक्ष

wमहाराष्ट्र व14 न्यूज, (दि.१३ मे) : पिंपरी चिंचवड शहरात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सोमवारी…

6 days ago

अजित पवारांचा निलशे लंके यांना थेट इशारा … अरे, “बेटो तू ज्या शाळेमध्ये शिकतोयस त्या शाळेचा हेडमास्टर अजित पवार आहे”!

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१० मे) : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या मतदानाआधी उपमुख्यमंत्री अजित पवार अहमदनगरमध्ये…

1 week ago