महाराष्ट्र 14 , (दि.२० ,मे) : चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या अर्जानुसार शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २२ ते ३० मे २०२३ या कालावधीतील त्यांची रजा मंजूर केली आहे. रजेपूर्वी २० व २१ मे २०२३ या शासकीय सुट्ट्या जोडून घेण्यास शासनाने मान्यता दिली. त्यांच्या गैरहजेरीत अतिरिक्त कार्यभार विक्रम कुमार यांच्याकडे दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह २२ ते ३० मे २०२३ या कालावधीत रजेवर आहेत. राज्य शासनाने त्यांची रजा मंजूर केली असून, त्यांच्या गैरहजेरीत महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे सोपविला आहे.
तसेच, शेखर सिंह रजेवरून परत आल्यानंतर पुन्हा याच पदावर त्यांची फेरनियुक्ती करण्यात येत असल्याचे सहसचिव सु, मो. महाडिक यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान, महापालिकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे. त्यात आयुक्त सर्वेसर्वा असल्यामुळे सर्व निर्णय त्यांच्या मार्फत घेण्यात येत आहेत. परंतु, ते मोठ्या रजेवर जाणार असल्याने महापालिकेतील मोठी कामे खोळंबणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.