Google Ad
Uncategorized

नागरिक स्मार्ट झाले, तरच शहर स्मार्ट होईल … कचरा टाकणारेच, करताहेत कचऱ्याची तक्रार … दोष कोणाला द्यायचा?

महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.21मे) : पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट होण्यासाठी महानगरपालिका अनेक प्रयत्न तसेच नवनवीन प्रयोग करत आहे, आणि नवनवीन उपक्रम राबवत आहे. पण तरीही शहर कचऱ्याच्या बाबतीत स्मार्ट का होत नाही? याचा विचार आपल्यासारख्या सामान्य नागरिकांनी कधी केलाय का? रस्त्यावर कचरा येतो कुठून, तो टाकतो कोण? तो तयार कसा होतो? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याकडेच आहेत, याचा कधीतरी विचार करायला हवा !

आपण नेहमी महानगरपालिकेला दोष देतो परंतु आपणच तो कचरा तयार करतो , अचानक तर तो कुठून येत नाही? याचा केव्हा विचार केलाय का, आपल्या प्रत्येकाच्या दारात घरासमोर, सोसायटीच्या आवारात कचऱ्याची गाडी येते , मग ओला आणि सुका कचरा वेगवेगळ्या ठिकाणी गाडीत टाकणे ही आपली जबाबदारी नाही का? “तो वेगवेगळा टाका”… फक्त आणि फक्त हे सांगण्यासाठी महानगरपालिका लाखो रुपये मोजते, हे आपल्याला माहीत आहे का ते कररूप पैसे आपले नाहीत का? आणि आपण म्हणतो, टॅक्स का वाढला? ते पैसे वाचले पाहिजेत ना? मग आपण विचार का करत नाही, आपण आपल्या घरात दारात कचरा टाकतो का? कचरा टाकताना ,रस्त्यावर थुंकताना थोडा विचार करायला पाहिजे, हे आपले शहर आहे, हा आपला परिसर आहे, तो परिसर तसेच आपले शहर स्मार्ट राहिले पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. आपण थोडे स्मार्ट झाले पाहिजे !

Google Ad

सर्वांनी विचार केला पाहिजे, आपण नेहमी इतरांची तुलना करत असतो . भारतात इंदोर सारखे शहर नेहमी स्वच्छ भारत अभियानात पहिला नंबर आणते, आपण केव्हा विचार केला तो नंबर का येतो? त्याचे मुख्य कारण म्हणजे तेथील नागरिक ! हे नागरिक आपला कचरा आपल्या घरात जिरवता येईल तेवढा जिरवता, घंटा गाडी आली तरी त्यात टाकताना वेगवेगळ्या प्रकारे टाकतात, बागेतील झाडांचा पालापाचोळा त्याचे खत तयार करून तेच झाडांना घालतात व विक्रीही करतात. रस्त्यावर बागेत फिरताना कुठेही कचरा टाकत नाहीत. कुठेही थुंकताना दिसत नाहीत. आपल्या शहरातील नागरिक असे झाले तर पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट व्हायला वेळ लागणार नाही, हेही तितकेच खरे आहे.

आपण हे करू शकतो :

आपल्या भागात महानगरपालिकेची घंटा गाडी आली नाही तर आपण तक्रार करू शकता , नागरिकांना रस्त्यावर कचरा टाकताना दिसल्यास रोकू शकता. नोकरीला जाणाऱ्या नागरिकांनी आपला कचरा घरात साठवून सुट्टीच्या दिवशी तो कचरा गाडीत टाकू शकता, रस्त्यावर कोणी कचरा टाकत असेल तर त्यास समजावून प्रभोधन करून रोखू शकता, तर आणि तरच आपण शहराचे स्मार्ट नागरिक म्हणण्यास पात्र ठरू शकतो. नाहीतर फोटो काढण्यापुरता एक दिवस हातात झाडू घेऊन , अभिमान घेऊन, गाडीवर भोंगा वाजवून, फक्त भिंती रंगवून त्यावर स्वच्छ शहर लिहून, आपण आणि आपले शहर स्मार्ट होऊ शकत नाही.

हा आहे फरक :

पिंपरी चिंचवड शहरातील पिंगळे गुरव या भागात महानगरपालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक कामे केली. रस्ते फुटपाथ स्मार्ट झाले, परंतु काही नागरिक अजून स्मार्ट झाले नाहीत असे दिसते, या भागात संरक्षण विभागाने आपल्या जागेस तारेचे कंपाउंड केले, तर लोक त्यावरून कचरा आत टाकतात, महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी तो काढायचा कसा? या भागातील भगतसिंग चौक, कासारवाडी पिंपळे गुरव पूल, राजीव गांधी वसाहती समोरील भिंत फुटपाथवर, मोरया पार्क, तसेच HP गॅस गोडावून जवळ विद्वधुत विभागाचा ट्रान्सफॉर्मर आहे त्याखाली लोक आपल्या घरातील कचरा आणून टाकतात. आणि हेच नागरिक दुर्गंधी पसरली , रस्त्यावर कचऱ्याचे ढीग झाले म्हणून महानगरपालिकेकडे तक्रार करतात. कचरा आपला आणि तक्रारही आपलीच! हेच नागरिक दारात कचरा गाडी येते पण त्यात तो टाकण्याचे कष्ट घेताना दिसत नाहीत.

शेजारी असणाऱ्या प्रभाग 31 नवी सांगवी प्रभागात रस्त्यावर, रस्त्याच्या दुतर्फा साठलेल्या कचऱ्याचे ढीग हे चित्र कुठेही दिसत नाही, शनी मंदिरा समोरही नागरिकांचे प्रभोधन करून कचरा कमी केला. त्यामुळे या भागात सहसा कुठे कचरा दिसत नाही, कारण नागरिक आपला कचरा घंटा गाडीतच टाकतात! असे चित्र सर्वत्र शहरात दिसले तर पिंपरी चिंचवड शहर स्मार्ट व्हायला वेळ लागणार नाही. “मीच आहे माझ्या शहराचा शिल्पकार”…!

Google Ad

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement