महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (M.I.D.C) यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या उद्योग पासून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकरण्यासाठी मध्यवर्ती सांडपाणी प्रक्रिया केंद्र (Common Effluent Treatetement Plant) बांधण्याकरता पुढाकार घेणे व तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबतचे निवेदन माजी खासदार गजानन बाबर यांनी उद्योग खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांना दिले आहे.
या निवेदनात बाबर यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या औद्योगिक क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (M.I.D.C)यांच्या सुमारे ११० एम. एल. डी पाणीपुरवठा होतो,
पिंपरी-चिंचवड शहरातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्याच्या उपाय योजनेचा एक भाग म्हणून पिंपरी-चिंचवड शहराचे माननीय आयुक्त यांनी C.E.T.P उभारणे बाबत दिनांक १२/०६/२०१२,दिनांक २३/०१/२०१३ व दिनांक ०६/०३/२०१३ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व एम सी सी आय ए, यांचे सोबत मनपामध्ये बैठकी घेतल्या होत्या.
औद्योगिक क्षेत्रात करण्यात येणाऱ्या CETP साठि एमआयडीसी, एमपीसीबी व एम सी सी आय ए,यांनी स्वतंत्र कंपनी ,Special Purpose Vehical (S.P.V) स्थापन करून या कंपनीमार्फत CETP उभारण्याचे काम करावयाचे आहे . सदर कंपनीमार्फत CETP प्रकल्पाचे संपूर्ण आर्थिक व तांत्रिक नियोजन करून प्रकल्प पूर्ण करणे अपेक्षित असून प्रकल्प खर्चाच्या 25 % हिस्सा तसेच आवश्यक असणार्या परवान्यासाठी अर्ज करणे इत्यादी कामे संबंधितांनी तात्काळ करून घेण्यात यावी.
सदर सीईटीपी साठी प्रकल्प अहवाल ( DPR ) मनपा मार्फत तयार करून मिळणेबाबत ची मागणी एम सी सी आय ए त्यांची दिनांक २३/०५/13 च्या पत्रान्वये मनपाकडे केलेली होती त्यानुसार मनपाने CETP साठी DPR तयार करणे कामी मे .अल्ट्राटेक एन्व्हायरमेंट कन्सल्टंट यांची नेमणूक करण्यात आलेली असून सदर कन्सल्टंट एमआयडीसी भागातील कंपन्यांचा सर्वे करून सांडपाण्याचे नमुने घेतलेले आहेत सदर माहितीवरून DPR तयार करण्याचे काम पूर्ण झाले आहे सदरचा डीपीआर पुढील अंमलबजावणीसाठी एम सी सी आय ए, एमआयडीसी व एम पी सी बी यांना दिनांक ०४/१०/२०१६ रोजी पाठवण्यात आला होता.
औद्योगिक क्षेत्रातील लघु उद्योगांमधून तयार होणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया होत नसल्याने पिंपरी-चिंचवड व भोसरी औद्योगिक क्षेत्रातून वाहणाऱ्या नैसर्गिक नाल्यांमधून सदरचे सांडपाणी शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नदीत मिसळते त्यामुळे नद्यांचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते नद्यांचे प्रदूषण टाळण्यासाठी मनपाने सादर केलेल्या नुसार त्वरित CETP प्रकल्पाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे याबाबत माननीय राष्ट्रीय हरित लवाद (NGT) यांनी केस नंबर ३७/ २०१६ अंतर्गत दिनांक १८/०७/२०१८ चे आदेशान्वये त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत.
सदरचे प्रस्ताविक CETP उभारण्याचे काम MCCIA,MPCB, MIDC यांचे संयुक्त SPV कंपनी मार्फत करणे आवश्यक आहे याबाबत मनपा मार्फत वेळोवेळी वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे त्यानुसार एमआयडीसीने पुढाकार घेऊन याबाबत त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे जेणेकरून शहरातून वाहणाऱ्या पवना व इंद्रायणी नद्यांचे या मुळे होणारे प्रदूषण टाळणे शक्य होईल, असे निवेदन माजी खासदार गजानन बाबर मावळ लोकसभा यांनी दिले आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ मे) : महाराष्ट्रातील 48 जागांपैकी 47 जागांवरील लढती कशा असतील हे…
महाराष्ट्र14 न्यूज, (दि.०२ मे) : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत २०५ चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये मा.निवडणूक…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ मे) : दिवांकुर संस्थेच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटप…
महाराष्ट्र 14 न्यूज, दिनांक- १ मे २०२४. नवी सांगवी (समर्थनगर) येथील प्रतिभा महिला प्रतिष्ठान संचलित…
महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२८ एप्रिल) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत.. बारामती तालुक्यातील…
महाराष्ट्र 24 न्यूज, दि.२५ एप्रिल : मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजपा-राष्ट्रवादी-आरपीआय-मनसे-रासपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंगआप्पा…