महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१२ ऑक्टोबर) : ग्रामीण भागात बालपण व प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या सोनाली झोळ इजिप्त येथे होत असलेल्या संयुक्त राष्ट्र हवामान परिषदेच्या ‘COP28 सिम्युलेशन मॉडेल’ परिषदेसाठी भारताचे राजदूत म्हणून प्रतिनिधित्व करत आहे. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेणे आणि हवामान कृतीसाठी आर्थिक संसाधने एकत्रित करणे यासह हवामान बदलाच्या तातडीच्या आव्हानांना तोंड देणे याविषयी इजिप्त येथे होत असलेल्या अरब स्टेटच्या पर्यावरण बदल परिषदेत पिंपरी चिंचवडच्या सोनालीचे भारताचे राजदूत म्हणून प्रतिनिधित्व ही अभिमानास्पद आहे. गतवर्षीच्या COP27 चेही सोनाली झोळ ने प्रतिनिधित्व केले होते. यासाठी तीला पिंपरी चिंचवड मधील ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ चे डायरेक्टर प्रा.भूषण ओझर्डे यांचे वेळोवेळी मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
‘COP28 सिम्युलेशन मॉडेल’ लीग ऑफ अरब स्टेट्सच्या अधिपत्याखाली होणार आहे. “इंजिनीर्स फॉर सस्टेनबल इजिप्त” ने लाँच केले आहे. हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, हवामान बदलाच्या परिणामांशी जुळवून घेणे आणि हवामान कृतीसाठी आर्थिक संसाधने एकत्रित करणे यासह हवामान बदलाच्या तातडीच्या आव्हानांना तोंड देणे हे COP28 चे उद्दिष्ट आहे. ही परिषद देशांना उद्दिष्टे निश्चित करण्यासाठी, सर्वोत्तम पद्धती सामायिक करण्यासाठी आणि हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वचनबद्धतेसाठी एक व्यासपीठ प्रदान करते. COP28 हवामान संकटाचा सामना करण्यासाठी आणि पॅरिस करारामध्ये नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि समन्वय वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
अनेक देशांनी गेल्या पाच ते सहा दशकांत केलेल्या औद्योगिक क्रांतिनंतर त्यांची जीवनशैली सुधारली. या प्रक्रियेतून निर्माण झालेल्या प्रदूषणाचे आणि नैसर्गिक नुकसानाचे पडसाद आता उमटायला सुरुवात झाली आहे. प्रदूषणाचे जगासाठी मोठे संकट ठरले आहे. दर वर्षी COP28 Simulation Model अरब राष्ट्रांची जागतिक हवामान बदल परिषद खऱ्या अर्थाने चर्चेत येत आहे, ते या परिषदेत वाढलेल्या तरुणांच्या सहभागामुळे. हवामान बदलांवर मार्ग काढण्यासाठी वर्षानुवर्षे चर्चेची गुऱ्हाळे दळणाऱ्या विविध देशांच्या प्रतिनिधींना नव्या पिढीची प्रतिनिधी राजदूत(Representative Ambassador) म्हणून भारताकडून एकमेव सोनाली प्रदूषणा बद्दल आपले मत मांडणार आहे. जगभरातील प्रदूषण समस्यांवर बोलणारी सोनाली नव्या पिढीची आदर्श ठरली आहे. सर्व प्रकारच्या आधुनिक माध्यमांचा कुशलतेने वापर करीत सोनाली तिचे कार्य सर्वां पर्यन्त पोहचवत आहे.
वडिलांच्या नोकरीमुळे तीचे बालपण व शालेय शिक्षण ग्रामीण भागातच झाले. अमरावती विद्यापीठाच्या सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयातून अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त करत तीने आकुर्डी पुणे येथील डीवाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून संगणक अभियांत्रिकी (M.E) मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान तीने स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी ‘ओझर्डे’ज रॅडिकल एज्युकेशन इंस्टीट्यूट’ या अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. तिथेच तीला भारतीय अंतराळ संशोधन संस्था(ISRO), युनायटेड नेशन्स सोबत कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. तसेच सभोवताली दिसणारी परिस्थिती, माध्यमांमधून येणाऱ्या प्रदूषण, हवामान बदलांच्या बातम्या सातत्याने कानावर पडल्यामुळेच, सोनाली पर्यावरणाबद्दल संवेदनशील झाली.
तीने इस्रो संस्थेमधून सर्टिफिकेशन कोर्स पूर्ण केलेला आहे. UNICEF मधील अन्न आणि कृषी संस्थेसाठी तीने कार्य केले आहे. जी20 परिषदेसाठी भारताची प्र्तिनिधी म्हणून तिची निवड झाली होती. युनायटेड नेशनच्या विविध परिषदा आणि शिखर परिषदेसाठी तीची निवड झालेली आहे. युनायटेड नेशन्सच्या युनायटेड नेशन्स कॉन्फरन्ससाठी निवडली गेली आणि युनाइटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन फॉर क्लायमेट चेंज ची एक युवा मतदारसंघाची सदस्य झाली. युनायटेड नेशन एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामचा सदस्यही झाली आणि या परिषदेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र 14 न्यूज, दि. 25 डिसेेंबर, 2024 : महाराष्ट्राच्या 58व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचे भव्य…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२१ डिसेंबर : अखेर राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. हिवाळी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : चिंतामणी ज्ञानपीठा तर्फे आशा राऊत यांचा तेजस्विनी पुरस्काराने सन्मान…
महाराष्ट्र व14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडी वेगाने सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१७ डिसेंबर : लाडक्या बहिणींसाठी गुडन्यूज आहे, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लाडकी बहीण…
महाराष्ट्र 14 न्यूज, दि.१५ डिसेंबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये लोकसभा निकालांच्या उलट निकाल लागल्याचं पाहायला…